शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडी दुभंगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:55 IST

राज्यात सत्ता समीकरणे बदलून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनावगळता अन्य पक्षांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीमध्ये आता उभी फूट पडली आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शहर विकास आघाडी दुभंगली कॉँग्रेस, मनसे, स्वाभिमान आघाडीबाहेर

रत्नागिरी : राज्यात सत्ता समीकरणे बदलून महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीची समीकरणेही बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनावगळता अन्य पक्षांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडीमध्ये आता उभी फूट पडली आहे.

राष्ट्रीय कॉँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर विकास आघाडीतून बाहेर पडली आहे. तर स्वाभिमान पक्षाचे भाजपमध्ये विलिनीकरण झाले आहे. आघाडीत मोठी फूट पडल्याने शिवसेनेचा विजयाचा मार्ग सोपा झाल्याची चर्चा आहे.रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक २०१६च्या अखेरीस झाली होती. त्यानंतर शिवसेनेचे थेट नगराध्यक्ष म्हणून राहुल पंडित निवडून आले होते. पक्षांतर्गत ठरल्यानुसार त्यांनी आपल्या पदाचा दोन वर्षांच्या कालावधीनंतर राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते.

रिक्त पदावर शिवसेनेचे बंड्या साळवी हे सध्या प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आता थेट नगराध्यक्षपदाची पोटनिवडणूक २९ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे, तर मतमोजणी व निकाल ३० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या हालचालींना जोर आला आहे.दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी कॉँग्रेस, बसपा व अन्य पक्षांतर्फे रत्नागिरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी शहर विकास आघाडी कायम असून, मिलिंद कीर हेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी केली होती. मात्र, त्यानंतर कॉँग्रेसने या आघाडीत काँग्रेस नसल्याने जाहीर केले आहे. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावयाचा याबाबत कोणताही निर्णय कॉँग्रेसने घेतलेला नाही, असे जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी स्पष्ट केले आहे.तसेच नगराध्यक्ष निवडणूक व अन्य विषयांबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी सकाळी कॉँग्रेस भुवन, रत्नागिरी येथे शहर व तालुका कॉँग्रेसची बैठक बोलविण्यात आली आहे. कॉँग्रेस, मनसे व स्वाभिमान पक्ष शहर विकास आघाडीतून बाहेर पडल्याने आघाडी कमकुवत झाली आहे. राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या समीकरणामुळे रत्नागिरीतही नगराध्यक्ष निवडणूक महाराष्ट्र विकास आघाडी म्हणून लढविली जाणार का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.शिवसेनेसाठी पेपर सोपा?रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपद निवडणुकीत शिवसेना व शहर विकास आघाडी असा सामना रंगण्याची आधी शक्यता होती. मात्र, आघाडीत फूट पडल्याने आता शिवसेनेबरोबरच भाजप तसेच कॉँग्रेस, मनसे यांचे उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी