शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वरवेलीत चिरेखाणी बंद होणार

By admin | Updated: May 22, 2016 00:47 IST

गुहागर तालुका : स्ट्रोनक्रशरवरही बंदी घालण्याचा ग्रामसभेचा ठराव

असगोली : गुहागर तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीची तहकूब सभा नुकतीच जिल्हा परिषद वरवेली शाळा क्र.१ मध्ये घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चिरेखाणी व स्टोनक्रशर कायमस्वरुपी बंद करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शशिकांत जाधव होते. या संबंधीच्या ठरावाची प्रत तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. स्टोनक्रशरपासून धुळीचा त्रास येथील काजू बागायतदारांना होत असल्याची तक्रार अनेकदा ग्रामसभांमधून करण्यात आली. या ग्रामसभेमध्येही शेतकऱ्यांनी याबाबत तक्रार केली. क्रशरचा त्रास शेतकऱ्यांना होत असेल तर तोही कायमस्वरुपी बंद करण्यात यावा असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. चिरेखाण मालकांशी वेळोवेळी ग्रामपंचायतीने चर्चा तसेच नियम पाळण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, या सुचनांचे योग्य पालन चिरेखाण मालकांकडून झाले नसल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ग्रामसेविका कल्याणी करंदेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. यावेळी त्यातील काही मुद्द्यांची ग्रामपंचायतीने कार्यवाही केली नसल्याची सूचना ग्रामस्थांनी मांडली. त्यानंतर उपसरपंच शशिकांत जाधव यांनी मागील ठरावाची अंमलबजावणी ग्रामपंचायतीने केली असल्याचे स्पष्ट करुन चिरेखाण व्यावसायिकांसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करताना काही जमीन मालक जागा देत नसल्याने पर्यायी रस्त्याची व्यवस्था झाली नसल्याचे स्पष्ट केले. बौद्धवाडी स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात जमीन मालक व बौद्धवाडी ग्रामस्थ तसेच गावातील ग्रामस्थ पुन्हा एकत्र येऊन सामोपचाराने हा प्रश्न सोडवणार असल्याचेही यावेळी जाधव यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत इमारत बांधकामाबाबत ग्रामसेविका करंदेकर यांना कामाचा आढावा घेतला. वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील पाणलोट विकासकामांची चौकशी तसेच पाणलोटला देण्यात आलेल्या साहित्याची योग्य ती चौकशी करण्यात यावी, असा ठरावही करण्यात आला. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चरखोदाई केली गेल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)