शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चिरा उत्खनन; कारवाईवर सुनावणी पुढे ढकलली

By admin | Updated: February 23, 2016 00:44 IST

तहसीलदार : व्यावसायिकांची मागणी मान्य

राजापूर : उत्खनन प्रकरणी राजापूर तहसीलदारांनी लावलेली सुनावणी चिरेखाण व्यावसायिकांच्या मागणीनुसार पुढे ढकलण्यात आली असून, आता ती २५ फेब्रुवारीला होणार आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी राजापुरातील चिरेखाणींवर अचानक धाड टाकून सुमारे पाच खाणी बंद करताना तेथे असलेल्या मशिन्सना सील लावले होते. त्यानंतर तालुका प्रशासनाकडून रितसर झालेल्या बेकायदेशीर उत्खननाची पाहणी करुन त्याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार सुमारे ३ हजार २५१ ब्रास चिऱ्यांचे बेकायदा उत्खनन करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. या चिरेखाणवाल्यांनी परवानगीपेक्षा अधिक उत्खनन केले आहे. त्यामध्ये प्रमोद घाडी ३७१ ब्रास, अजित धुमाळे ९३० ब्रास, नारायण गार्डी १५८ ब्रास तर रस्त्यापासून अंतर सोडण्याच्या नियमाचा भंग केल्यामुळे अनिल पांगरे यांना ६२६ ब्रास, मनोज पवार २९६ ब्रास व कुमार इपलकर यांनी ८७० ब्रास बेकायदेशीर उत्खनन झाले आहे. या सर्वांविरुध्द प्रती ब्रास २२०० प्रमाणे त्याच्या पाचपट व प्रती ब्रास १०० रुपयांप्रमाणे रॉयल्टी या स्वरुपात दंड ठोठावण्यात आलेला आहे. त्यानुसार ही दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी संबंधित खाणवाल्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी महसूल प्रशासनाने संधी देताना सोमवारी सुनावणी आयोजित केली होती. त्याची नोटीस संबंधितांना पाठविण्यात आली होती. मात्र, चिरेखाण चालकांकडील कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्यांनी पुढील तारीख म्हणणे मांडण्यासाठी दिली जावी, अशी मागणी तहसीलदार सचिन भालेराव यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून, पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी) ४जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून केले होते पाच ठिकाणी मशिन्सना सील. ४खाणवाल्यांना बाजू मांडण्यासाठी सुनावणी.