शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या धसक्याने चिपळूणच्या चाकरमान्यांची उत्सवाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २२४ गणेशोत्सव विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच एस. टी. बसही जादा सोडण्यात आल्या आहेत. या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल होते. चिपळुणात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. मात्र, चिपळुणात पुराच्या धसक्याने अनेकांनी गणेशोत्सवाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत चाकरमान्यांची संख्या कमीच आहे.

चिपळुणात १६,५०० घरगुती तर १५ सार्वजनिक गणेशमूर्ती स्थानापन्न झाल्या आहेत. काेराेनामुळे सार्वजनिक गणपतींपैकी ५ गणपतींचे प्रथमच दीड दिवसाने विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाला चाकरमानी कोकणात एक दिवस का होईना हजेरी लावतो. गतवर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे फार चाकरमानी गावी आले नाहीत. मात्र, यावर्षी काहीशी परिस्थिती नियंत्रणात असल्याने व रेल्वे आणि बस सेवा सुरू आहेत. कोकणात येणारी प्रत्येक गाडी हाऊसफुल आहे; परंतु चिपळूणच्या बाबतीत काहीशी वेगळी परिस्थिती आहे.

चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झाले. अजूनही येथील परिस्थिती स्थिर झालेली नाही. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुराचा धसका घेत अनेक चाकरमान्यांनी चिपळुणात येणे टाळल्याचे पुढे येत आहे. आतापर्यंत ७५ एस. टी. बस व खासगी वाहनांतून सुमारे १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. आतापर्यंत अन्य बस स्थानकातून ४०० बस फेऱ्या येथील आगारात दाखल झाल्या असून, अजूनही गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे सध्या रेल्वे स्टेशनसह बस स्थानकात आलेल्या चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत असली तरी ही संख्याही कमीच आहे.

----------------------

मुंबई, पुण्यातील ६० टक्के चाकरमान्यांचे लसीकरण

कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केले आहे. सुरुवातीला प्रशासनाने दोन डोस न घेतलेल्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, चाकरमान्यांच्या तोबा गर्दीमुळे ती शक्य नसल्याने ती चाचणी रॅपिडवर आणण्यात आली. मात्र, तेही शक्य नसल्याने चाकरमान्यांची नोंदणी त्या त्या रेल्वेस्थानकांवर, बसस्थानकांवर करण्यात येत आहे. त्यानुसार ६० टक्के चाकरमान्यांनी दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली.