शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात धान्य महोत्सव

By admin | Updated: March 23, 2017 15:06 IST

२५ मार्चपासून प्रारंभ, ८0२ क्विंटल धान्य उपलब्ध

आॅनलाईन लोकमतचिपळूण : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी वसंत शेतकरी विकास संघ चिपळूणतर्फे जिल्हास्तरीय धान्य महोत्सव व शेतीविषयक चर्चासत्र दि.२५ ते २७ मार्च या कालावधीत अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकूल नगर परिषदेसमोर होणार आहे. या महोत्सवात ८०२ क्विंटल धान्य उपलब्ध असणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी रघुनाथ जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.या ठिकाणी महोत्सवात दर्जेदार व निवडक शेती माल उपलब्ध होणार असून नागरिकांनी निवडक व स्वस्त धान्य खरेदीचा लाभ घ्यावा या साठी शनिवार दि. २५ ते २७ मार्च असे तीन दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री होणार असून कमीत कमी दरात शेतमाल उपलब्ध होणार आहे. शिवाय फळे, भाजीपाला, सेंद्रिय माल स्वच्छ व निवडक शेतीमाल, सेंद्रिय शेतीतून उत्पादन केलेला माल, ठेवणीसाठी उपयुक्त व दर्जेदार माल, दुर्मिळ व देशी वाण, सेंद्रिय गुळ, काकवी यांचाही समावेश राहणार आहे. शिवाय कलमे, रोपे, फळे, गांडूळ खत यांची विक्री होणार आहे. विविध बचत गटांनी उत्पादित केलेला मालही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.८४ क्विंटल नागली,७२ क्विंटल गहू, ५० क्विंटल शालू ज्वारी, ५२२ क्विंटल तांदुळ, ४१५ क्विंटल हळद, १८ क्विंटल पावटा असे विविध अन्नधान्य व कडधान्याचे प्रकार येथे असणार आहेत. असेही सरतापे यांनी सांगितले.तीन दिवस डॉ. वैंभव शिंदे, मिलींद पाटील, मिलींद वैद्य, शिरिष तेरखेडकर व फ्रांसिस डिसोझा हे तज्ज्ञ शेती विषयक मार्गदर्शन करणार आहेत. दि.२५ रोजी सकाळी १० वाजता अण्णासाहेब खेडेकर क्रिडा संकुलात आमदार भास्कर जाधव व आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, सभापती पूजा निकम, उपस्थित राहणार आहेत.तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कृषि अधिक्षक एस. एच.जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एच. सरतापे ,कृषि वसंत शेतकरी विकास संघाचे बापू काणे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)