शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण खरेदी - विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: June 20, 2015 00:36 IST

१६ जागांसाठी २१ अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने

चिपळूण : चिपळूण तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची २०१५-१५ ते २०२०-२१ ची निवडणूक आज (शुक्रवारी) बिनविरोध झाली. १६ जागांसाठी २१ अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली, अशी माहिती संचालक अशोक कदम यांनी दिली.चिपळूण तालुका खरेदी - विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक सहाय्यक उपनिबंधक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या निवडणुकीसाठी ३० मे ते ३ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ५ जून ते १९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. या मुदतीत आज अखेरच्या दिवशी इतर मागास प्रवर्गातून सुरेश खापले, व्यक्तीगत मतदार संघातून कृष्णा खांबे, सत्यविजय शिंदे, महिला राखीवमधून राधिका माटे, सहकारी संस्था मतदार संघातून संतोष चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सहकारी संस्था मतदार संघातून चिपळूण गटातून दिलीप माटे, कापरे गटातून विजय शिर्के, कात्रोळी गटातून पांडुरंग माळी, ताम्हणमळा गटातून सदाशिव चव्हाण, मार्गताम्हाणे गटातून चंद्रकांत चव्हाण, सावर्डे गटातून अमित कोकाटे, नांदगाव गटातून संजीवकुमार गुजर, निवळी गटातून किसन महाडिक, कळकवणे गटातून अशोक कदम, शिरगाव गटातून तुकाराम बंगाल हे विजयी झाले. इतर मागासवर्गीय मतदार संघातून कृष्णा खांबे, विमुक्त जाती भटक्या जमातीमधून दिनेश माटे, व्यक्तीगत मतदार संघातून शिवाजी चिले, अनुसूचित जाती जमातीमधून दिलीप चिपळूणकर, महिला प्रतिनिधी स्मिता सुभाष चव्हाण, फैरोजा मोअज्जम म्हाते यांची बिनविरोध निवड झाली. १६ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे व संचालक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, माजी सभापती सुरेश खापले, माजी उपसभापती संतोष चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य सईद खलपे, विद्यमान चेअरमन चंद्रकांत चव्हाण व सर्व संचालक यांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले अशी माहिती संचालक अशोकराव कदम यांनी दिली. (प्रतिनिधी)खरेदी विक्री संघाची बिनविरोध निवडीने सहकार क्षेत्रात आनंद. ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने बिनविरोधचा मार्ग झाला सुकर. १६ जागांसाठी दाखल झाले होते २१ अर्ज. सहकारातील जाणकारांनी केली मध्यस्थी. माटे यांच्या निधनानंतरची पहिलीच बिनविरोध निवडणूक.