शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

चिपळुणात निवडणुकीची नांदी

By admin | Updated: August 24, 2016 23:45 IST

राजकीय धुळवड : सदानंद चव्हाण-पालिकेत निषेध युध्द

सुभाष कदम -- चिपळूण -नगरपरिषदेची निवडणूक १६ डिसेंबरला होणार आहे. त्याची नांदी आमदार सदानंद चव्हाण विरूद नगर परिषद यांच्यातील निषेध युद्धाने झाली आहे. येथील आमसभेत सभाध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण यांनी नगर परिषदेच्या निषेधाचा ठराव मांडला आणि नगर परिषदेतर्फे मंगळवारी त्या ठरावाचा निषेधही करण्यात आला.चिपळूणची आमसभा शुक्रवारी झाली. या आमसभेत नगरसेवक अविनाश केळसकर यांनी मागासवर्गीय निधी खर्ची पडत नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे उत्तर नगरसेवक केळसकर यांना पटले नाही. नगरसेवक केळसकर यांना आपण पालिकेचे सन्माननीय सदस्य आहात, हा प्रश्न आपण तेथे विचारून माहिती घ्यायला हवी होती, असे आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले. परंतु, नगरपरिषदेच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. आपल्याकडेही अनेकांनी तक्रारी केल्या आहेत, त्यामुळे त्यांनी नगरपरिषदेच्या कारभाराच्या निषेधाचा ठराव केला. खरेतर हा ठराव करण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, आवश्यक ती माहिती घेऊन आमदार चव्हाण यांनी हा ठराव केला असता तर त्याला अधिक अर्थ प्राप्त झाला असता. नगराध्यक्षा सावित्री होमकळस, गटनेते राजू कदम व पालिकेच्या आजी-माजी सभापतींनी आमदार चव्हाण यांच्या निषेध ठरावाचा निषेध केला. हा ठराव करताना त्यांनी मागासवर्गीयांसाठी प्रतिवर्षी झालेल्या खर्चाचा आढावा पत्रकारांसमोर मांडला. आमदारांनी माहिती घेऊन निषेधाचा ठराव मांडायला हवा होता, असे सांगतानाच आमदार चव्हाण यांनी पालिकेसाठी किती निधी उपलब्ध करुन दिला. शहराच्या विकासासाठी किती आढावा बैठका घेतल्या? त्या एकदा जाहीर कराव्यात, असे आव्हान सत्ताधाऱ्यांनी दिले. शिवाय आमदारांच्या नातेवाईकांनी पालिका आवारातील अपूर्ण ठेवलेल्या कामात एकदा आमदारांनी लक्ष घालावे, असेही सांगितले. एकूणच आमसभेत झालेला ठराव हा नगरपरिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेला आहे. त्यामुळेच आता या उखाळ्यापाखाळ्या सुरु झाल्या आहेत. निवडणुका जवळ येतील तसतसे आरोप-प्रत्यारोप वाढत जातील, हा निसर्गनियम आहे. त्यामुळे पुढील काळ हा नागरिकांसाठी करमणुकीचा ठरणार आहे. आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडतानाच राजकीय पक्षांमधील नैतिक पातळी व परिपक्वतेचे दर्शनही घडणार आहे. त्यामुळे आमसभेतील निषेधाच्या ठरावाने काय साधणार हे काळच ठरवेल. आज तरी हा ठराव राजकीय असल्याचीच चर्चा आहे.शीतयुध्द : राजकीय वर्तुळात ठरलाय चर्चेचा विषयचिपळूण नगरपरिषद आणि आमदार सदानंद चव्हाण यांच्यात सध्या निषेध युध्द सुरु आहे. त्यामुळे निषेध ठराव हा चिपळुणातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शुक्रवारी झालेल्या आमसभेत आमदार सदानंद चव्हाण यांनी निषेध केला आणि या ठरावाचा निषेध त्यानंतर लगेचच नगर परिषदेने केला. या निषेधाच्या ठरावामुळे आमदार आणि नगर परिषद यांच्यात चांगलेच शीतयुध्द पेटले आहे.