शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात दोन्ही काँग्रेसची भाजपला साथ

By admin | Updated: December 29, 2016 00:04 IST

उपनगराध्य निवडी : खेडमध्ये सेनेत बंडखोरी; दरेकर यांच्यावर कारवाई ?

रत्नागिरी : खेडमध्ये शिवसेनेत उपनगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान दुफळी माजली असून, बंडखोरीमुळे शिवसेनेचे दोन्ही उमेदवार उभे ठाकले आहेत. चिपळुणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला उपनगराध्यक्ष पदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपला साथ दिल्याने अल्पमतातील भाजपला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा मान मिळाला आहे. बुधवारी झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीत रत्नागिरीत राजेश सावंत (शिवसेना), खेडमध्ये सुनील दरेकर (शिवसेना) आणि चिपळुणात निशिकांत भोजने (भाजप) यांचा विजय झाला आहे.खेडमध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळाराम खेडेकर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्याचवेळी सुनील दरेकर यांनीही आपला अर्ज दाखल केला. या दोघांनाही समसमान म्हणजेच नऊ मते मिळाली. शेवटी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी त्यांचे निर्णायक मत दरेकर यांच्या बाजूने दिले. त्यामुळे दरेकर हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. यामुळे सेनेअंतर्गत दुफळी समोर आली असून, शिवसेना दरेकर यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.चिपळुणात अल्पमतात असलेल्या आणि थेट नगराध्यक्ष निवडीत विजयी झालेल्या भाजपला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने साथ दिली. त्यामुळे सर्वांत मोठा पक्ष असूनही शिवसेनेला उपनगराध्यक्षपदही मिळविता आले नाही. या ठिकाणी भाजपचे निशिकांत भोजने विजयी झाले आहेत. रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे राजेश सावंत यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. रत्नागिरीत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळविल्याने या ठिकाणी कोणताही करिष्मा झाला नाही.