शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकली अपहरणाचा तपास थंडावला

By admin | Updated: March 28, 2016 00:19 IST

पोलिसांसमोर आव्हान : अपहरणकर्ते दाम्पत्य ठिकाण बदलत असल्याने अडथळा

लांजा : रात्री आईच्या कुशीत झोपी गेलेल्या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण करणारे जोडपे सातत्याने आपले ठिकाण बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या जोडप्याचा शोध घेण्यात लांजा पोलीस अपयशी ठरले आहेत.सांगली जिल्ह्यातील अजित दस्तगीर जमादार हा ट्रकचालक आपल्या दोन मुली व पत्नीसह आंजणारी येथील शिंदे यांच्या चाळीमध्ये भाड्याने राहात होता. शेजारी राहणारी पूजा, तिचा नवरा प्रसाद, पूजाची आई संगीता तसेच विश्वास नामक एक व्यक्ती यांच्या आधीपासून ४ ते ५ दिवसांपूर्वी राहावयास आली होती. सहा महिन्यांची स्नेहल गोंडस असल्याने तिला खेळवण्यासाठी हे जोडपे घेऊन जात असे. पूजा हिला मूलबाळ नसल्याने पूजाची आई संगीता हिने अजित यांची पत्नी सारिका हिला तुझी लहान मुलगी आम्हाला देशील का? अशी विचारणाही केली असल्याचे तपासात स्पष्ट झाले.दिनांक २३ मार्च रोजी प्रसादने रात्री मद्यपान करून जमादार यांच्या खोलीच्या दरवाजावर लाथा मारल्याने त्यांच्यात भांडण झाले होते. शिमगोत्सव असल्याने चालक मिळत नव्हते. अजित हा बदली चालक म्हणून गोवा येथे ट्रक घेऊन गेला होता. खोलीमध्ये सारीका, तिची अडीच वर्षांची मुलगी आणि सहा महिन्यांची स्नेहल हिला घेऊन ती झोपी गेली होती. रात्री १ ते ४ दरम्याने प्रसाद व पूजा यांनी स्नेहल हिचे अपहरण केल्याचे सकाळी सारीकाच्या लक्षात आले. तिने आपल्या पतीला घडल्या प्रकाराची माहिती दिली. आंजणारी येथे आल्यानंतर अजित याने प्रसादला फोन केला. त्यावेळी मुलगी माझ्याकडे आहे. दुपारपर्यंत घरी आणून सोडतो, असे सांगितले. मात्र, सायंकाळपर्यंत मुलगी परत न आल्याने सारीका जमादार हिने लांजा पोलिसात अपहरणाची फिर्याद दिली. अपहरण केल्यानंतर पूजा व प्रसाद या जोडप्याने आंजणारी येथील आपली खोली सोडली. त्याच्या समवेत पूजाची आई संगीता व विश्वास हीदेखील असावेत, असा अंदाज लांजा पोलिसांनी वर्तविला आहे.गेल्या चार दिवसांपासून लांजा पोलीस पूजा व प्रसाद या जोडप्याचा शोध घेण्यासाठी प्रसाद याच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन तपासत आहेत. प्रसाद चार दिवसांपासून आपल्या राहण्याच्या जागा सतत बदलत असल्याने लांजा पोलीसदेखील चिंतेत सापडले आहेत. गेल्या चार दिवसांमध्ये रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या ठिकाणचे प्रसादचे लोकेशन दिसत आहे. मात्र, संशयित आरोपींचे फोटो सध्या कोणाकडेही उपलब्ध नसल्याने शोध घेणे अवघड बनले असल्याचे पोलिसांनी सांगितले.या सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीचे अपहरण नेमके कशासाठी करण्यात आले, कोणता अंधश्रद्धेचा भाग तर नसावा ना, अशी शंका आता वाटू लागली आहे. लांजा पोलीस अद्यापही या जोडप्याचा कसून शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)अपहरणकर्त्या जोडप्याचा विविध अंदाजाने शोध घेतला जात आहे. एकीकडे टॉवरचे ठिकाण जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु त्या ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचण्यापूर्वीच दाम्पत्य ते ठिकाण बदलत असल्याने पोलिसांसमोर अपहरणकर्त्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.अपहरणकर्त्या दाम्पत्याचे छायाचित्रही नसल्याने तपास थंडावला.अपहरणकर्ते वारंवार ठिकाण बदलत असल्याने मोबाईल टॉवरचे नेमके ठिकाण सापडेना.गेल्या चार दिवसात कोल्हापूर, रायगड येथे अपहरणकर्त्यांचा वावर.दाम्पत्याची हुशारीपोलिसांना मोबाईलवरून टॉवरचे नेमके ठिकाण मिळू नये, यासाठीच दाम्पत्य सावधगिरीने ठिकाण वारंवार बदलत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.