शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्येतून तरूणीची आत्महत्या

By admin | Updated: February 26, 2017 00:11 IST

देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू

देवरूख : नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली येथे प्रियांका सुभाष इंदुलकर या तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवारी) सकाळी घडली. याबाबत देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.विघ्रवली (राववाडी) येथील प्रियांका इंदुलकर ही कला शाखेची पदवीधर होती. तिला नोकरी करण्याची प्रबळ इच्छा होती. तिने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न देखील केले होते. मात्र, या प्रयत्नांना यश न आल्याने प्रियांका ही गेली अनेक दिवस नैराश्येत होती. कधीतरी नोकरी मिळेल, या आशेवर ती होती. पण, तिला नोकरीने कायम हुलकावणीच दिली. या नैराश्येतूनच तिने आज सकाळी राहत्या घरी सकाळी ८.३०च्या सुमारास घराच्या पोटमाळ्यावर नायलॉनच्या ओढणीने गळफास लावून घेतला. प्रियांका बराचवेळ घरात दिसत नसल्याने तिची शोधाशोध केली असता, ती घराच्या पोटमाळ्यावर लटकताना दिसून आली. तिला तत्काळ खाली उतरवून देवरूख ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉ. सुनील दैठणकर यांनी प्रियांकाची तपासणी करुन तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकाँस्टेबल लहू शिवगण करीत आहेत. याबाबत देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)देवरूख ग्रामीण रूग्णालयाचा भोंगळ कारभारप्रियांका हिने गळफास घेतल्यानंतर तिच्यावर तत्काळ उपचार होऊन तिचा जीव वाचावा, यासाठी तिला देवरूख रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, यावेळी वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे रजेवर होते. यामुळे प्रियांका हिची तपासणी होऊ शकली नाही. तसेच शवविच्छेदनासाठीदेखील डॉक्टर नसल्याने सायले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शवविच्छेदन