शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी मुख्याधिकारी ‘लय भारी?’

By admin | Updated: July 17, 2014 23:52 IST

सत्ताधारी रथी-महारथींनाही भारी

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी रंजना गगे या पालिकेतील सत्ताधारी रथी-महारथींनाही भारी पडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याआधी नियमित मुख्याधिकारी व गेल्या चार महिन्यांपासून प्रभारी मुख्याधिकारी असताना सातत्याने त्यांच्या कारभाराविरोधात ओरड करणाऱ्या महायुतीच्या सत्ताधाऱ्यांना त्यांनी नियमांवर बोट ठेवत आपल्या पदाचा हिसका दाखविल्याने सत्ताधारी हैराण झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू झाली असून, त्यांना तत्काळ बदलावे, असे निवेदन युतीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. याआधीही अशी तक्रार देण्यात आली होती. मात्र, कारवाई काहीच झाली नव्हती. तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे या कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली झाली होती. मुख्याधिकारीपदी एम. बी. खोडके असताना सत्ताधारी व प्रशासन या सर्वांनाच सांभाळून घेत कारभार सुरू होता. मात्र, त्या काळातही रत्नागिरीच्या मुख्याधिकारीपदी पुन्हा येण्याचे गगे यांचे प्रयत्न सुरू होते. पालिकेतील जाणता राजा व जुना कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यालाही गगे यांचे रत्नागिरी पालिकेत पुनरागमन व्हावे, असेच वाटत होते. परंतु त्यांची नियुक्ती राजापूर पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून झाली. मुख्याधिकारी खोडके यांची चार महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर रत्नागिरी पालिकेला तात्पुरता कार्यभार पाहणारे अनेक मुख्याधिकारी मिळाले. त्यानंतर हा कार्यभार राजापूरच्या मुख्याधिकारी रंजना गगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून पूर्वी काम करताना व आता प्रभारी म्हणून काम करताना त्यांची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली आहे. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे सत्ताधाऱ्यांना मानवणारे नव्हते. त्यामुळे पालिकेतील सध्याचे महायुतीचे पदाधिकारीही त्यांच्या विरोधात आहेत. आता प्रभारी मुख्याधिकारी म्हणून काम पाहतानाही त्यांनी रस्त्यांची कामे सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्यासह अनेक बाबतीत शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करीत सत्ताधारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना ठेंगा दाखवला. पालकमंत्र्यांच्या आडून कारभार पाहतात, असा आरोपही गगे यांच्यावर झाला आहे.आता पुन्हा अनेक विकासकामांवरून महायुती व मुख्याधिकारी यांच्यात जोरदार वाद सुरू असून, त्यातूनच गगे यांची तत्काळ बदली करून पालिकेला नियमित मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)मॅडमपुढे काही चालेना!३० वर्षांपासून पालिकेच्या मारुती मंदिर येथील व्यापारी गाळ्यांचे भाडे थकीत असल्याने या गाळ्यांना सील ठोकण्यात आले. पूर्ण थकबाकी दिल्याशिवाय हे गाळे संबंधितांच्या ताब्यात देऊ नयेत, असा ठरावही महायुतीने सर्वसाधारण बैठकीत केला. ३० वर्षे थकबाकी ठेवणाऱ्यांना दया दाखवणे चुकीचे आहे, अशी महायुतीची भूमिका असतानाही मुख्याधिकारी गगे यांनी पुन्हा आपलाच वरचष्मा दाखवत २५ टक्के रक्कम स्वीकारून थकबाकीदारांना गाळ्यांचा ताबा दिला. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत प्रचंड संताप आहे. नागरिकांतही रोष आहे. परंतु सत्ताधाऱ्यांचे मॅडमपुढे काही चालेना, अशी स्थिती आहे.