शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात दोन महिन्यात वाहन चालकांकडून ३ लाखाचा दंड वसूल

By admin | Updated: March 8, 2017 17:20 IST

वाहतूक पोलिसांकांकडून कारवाईचा बडगा

चिपळुणात दोन महिन्यात वाहन चालकांकडून ३ लाखाचा दंड वसूल चिपळूण : गेल्या दोन महिन्यात येथील वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या १३३८ वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांनी १३२५ वाहन चालकांकडून २ लाख ७९ हजार ३०० रुपयांचा तर न्यायालयाने १३ वाहन चालकांना २२ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये एकूण ३ लाख १ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. जानेवारी व फेबु्रवारी या दोन महिन्यात दुचाकीवर ट्रीपल सीट बसविल्याप्रकरणी १६५ वाहन चालकांकडून ३३ हजार ६०० रुपये, लायसन्सजवळ न बाळगल्याप्रकरणी ५१३ जणांकडून १ लाख २ हजार ८०० रुपये, कागदपत्र जवळ न बाळगल्याप्रकरणी ५५ जणांकडून १० हजार रुपये, लांब मालाची वाहतूकप्रकरणी १८ वाहनांवर ३ हजार ६०० रुपये, रहदारीस अडथळाप्रकरणी ५२ जणांकडून १० हजार ६०० रुपये, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण प्रकरणी ४५ जणांकडून ९ हजार रुपये, नियमांचा भंगप्रकरणी ४०९ जणांकडून ८२ हजार ८०० रुपये, फ्रंटशिट बसविल्या प्रकरणी एकाकडून २०० रुपये, वाहनाला नंबर प्लेट न बसविल्या प्रकरणी ६ चालकांकडून १ हजार २०० रुपये, गणवेश न घातल्याप्रकरणी २ चालकांकडून ४०० रुपये, हेल्मेट न घातलेल्या एकाकडून ७०० रुपये, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणाऱ्या ७ जणांकडून १ हजार ४०० रुपये, साईड आरसा नसल्याने १२ चालकांकडून १ हजार २०० रुपये, अनुज्ञतीधारक चालक सोबत नसल्याप्रकरणी १६ जणांकडून ७ हजार ९०० रुपये, राँगटर्न मारल्याबद्दल दोघांकडून ४०० रुपये, फॅन्सी नंबरप्लेटप्रकरणी चार चालकांकडून १ हजार ६०० रुपये, १८ वर्षाखालील मुलांनी वाहन चालविल्याप्रकरणी पाच जणांकडून २ हजार ५०० रुपये, चालक परवाना नसल्याने एकाकडून ५०० रुपये, धोकादायकरित्या वाहन चालविणाऱ्यांकडून १२०० रुपये, ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी एकाकडून १ हजार १०० रुपये, याशिवाय अवैध प्रवाशी वाहतूक प्रकरणी न्यायालयाने १२ जणांना २१ हजार ३०० रुपये दंड ठोठावला आहे. (प्रतिनिधी)