शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटातील महिलांची घरकुलच्या नावाने फसवणूक

By संदीप बांद्रे | Updated: August 7, 2023 21:23 IST

चिपळूणातील पोलिसांना निवेदन, शंभरहून अधिक महिला आल्या अडचणीत

संदीप बांद्रे/ चिपळूण : दहा हजार रूपयात घरकूल व १७०० रूपयात शिलाई मशिन देतो असे सांगून येथील बचत गटाच्या शंभरहून अधिक महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माजी आमदार रमेश कदम यांनी गंभीरपणे दखल घेत महिलांसह सोमवारी पोलिस स्थानकात जाऊन या प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी केली. याप्रकरणात लाखोंची फसवणूक झाली असून याबाबतच्या निवेदनात बीड येथील महाराष्ट्र क्रांतीसेना संस्थेवर कारवाईची मागणी केली आहे.

आर्थिक दृष्टया दुर्बल घटकाचे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शहर व परिसरातील बचत गटातील महिला या फसवणूकीला बळी पडल्या आहेत. डिसेंबर महिन्यात उषा अशोक पवार, सरिता संजय पवार, दिक्षा दिपक माने व पूजा धिरज नलावडे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बचत गटाच्या महिलांची बैठक घेतली. महाराष्ट्र क्रांतीसेना संस्थेच्या अंतर्गत शासनाच्या योजनेतून शिलाई मशीन व ज्यांना निवारा नाही, अशांना घरकूल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवले. घरकुलासाठी दहा हजार रूपये तर शिलाई मशिनसाठी १७०० रूपये भरावे लागतील असे सांगितले. त्यानुसार बचत गटातील महिलांनी त्या अमिषाला बळी पडत पैसे भरण्याची सहमती दर्शवली. त्यासाठी काही महिलांनी स्वतःचे दागिणे बॅंकेत व पतसंस्थेत गहाण ठेवून, विकून पैसे त्या संस्थेच्या बँक खात्यात जमा केले. 

गेले अनेक दिवस याविषयी चौकशी केल्यानंतरही शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत, लवकरच तुमच्या घरकुलाचे पैसे मंजूर झाल्याचे पत्र येईल. असे एकच उत्तर त्यांच्याकडून वारंवार मिळत होते. यातील काही महिलांचा विश्वास जपण्यासाठी शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. मात्र घरकुलाची चौकशी केल्यावर उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. काही महिलांनी वारंवार विचारणा केल्यानंतर त्यांना दमदाटी करण्यात आली. परंतू अद्याप एकाही महिलेला घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने आमची फसवणूक झाली असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी माजी आमदार रमेश कदम यांच्यासह दिलीप माटे, हिंदुराव पवार, विलास चिपळूणकर, रंजिता ओतारी, दिपमाला नाटुस्कर, सुनंदा पवार, काजल चौगुले, छाया माने, सुवर्णा  पवार, दिपाली माने, वैशाली नलावडे, सुजाता नलावडे, अंकिता पवार, लक्ष्मी मोहिते, शोभा पवार, ललिता पवार, अश्विनी माने, जयश्री चौगुले आदी महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Chiplunचिपळुणfraudधोकेबाजी