शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुहागरात अष्टविनायक एनर्जीविरुद्ध दोषारोपपत्र

By admin | Updated: July 16, 2014 23:05 IST

सुशिक्षित नोकरदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या

गुहागर : कमोडिटी मार्केटिंगच्या माध्यमातून गुहागरातील सुशिक्षित नोकरदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या श्री अष्टविनायक एनर्जी अँड मेटल कंपनीच्या प्रभाकर चंद्रप्पा चौगुले, प्रदीपकुमार पांडुरंग पतंगे व त्यांना सहाय करणाऱ्या गुहागरमधील विश्वास शंकर माने यांच्याविरोधात गुहागर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.कोल्हापुरातील श्री अष्टविनायक कंपनीकडून कमोडिटी मार्केटिंगच्या नावाखाली करोडो रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. कंपनीचा सूत्रधार प्रदीपकुमार पतंगे याच्यावर विविध गुन्हे दाखल करुन कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. प्रभाकर चौगुले व प्रदीपकुमार पतंगे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केल्याने या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुहागर येथील अनेकांचे धाबे दणाणले. गुहागर विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास शंकर माने यांच्या मध्यस्थीने प्रभाकर चौगुले याने गुहागर येथेही शिक्षकांना कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले.यानंतर अण्णासाहेब पाटील, विलास पांडुरंग कोकरे यांनी आपल्या फसवणुकीबाबत पोलिसांकडे कैफियत मांडली. यानुसार ६० लाख ४० हजार रुपये इतकी फसवणूक झाल्याची नोंद झाली. असे असले तरी अनेक शिक्षक व ग्रामस्थांनी लाखो रुपये यामध्ये गुंतवले होते. मात्र, बदनामी टाळण्यासाठी व पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी अनेकांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. याबाबत गुहागर पोलिसांनी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, उपनिरीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केल्यानंतर १४ जुलैला गुहागर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. लवकरच याप्रकरणी खटल्याला आता सुरूवात होणार आहे. (प्रतिनिधी)