दापाेली : रस्त्याच्या बाजूला उभे असताना दाेघांना दमदाटी करून मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना २७ जून राेजी रात्री ७.३० वाजण्याच्या दरम्यान कुडावळे भुईदवाडी येथे घडली. याप्रकरणी दापाेली पाेलीस स्थानकात सातजणांवराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिनाद शांताराम महाडिक (३८, रा. कादिवली बाैद्धवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते स्वत: व शरद सखाराम पाचणेकर हे २७ जून राेजी रात्री तालुक्यातील कुडावळे भुईदवाडी येथील मुख्य रस्त्याच्या कडेला उभे हाेते. त्याचवेळी नितीन जगदीश पवार यांनी साथीदारांसह येऊन फिर्यादी दिनाद यांना दमदाटी व शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. सर्व सात संशयित आरोपींनी दिनाद यांना दगडाने मारहाण केली. याचवेळी नितीन याने दिनाद यांना काखेजवळ चावा घेतला तर शरद पाचणेकर यांना जमावातील दोघांनी मारहाण केली तसेच जातीवाचक शिवीगाळ करून ठार मारुन टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी फिर्यादीनुसार सातजणांविरोधात भारतीय दंड विधान कलम अन्वये ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.