शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकाला बदला

By admin | Updated: February 23, 2016 00:22 IST

शिक्षण समिती सभापतींचे प्रशासनाला आदेश

 देवरुख : नजीकच्या ओझरे मुंढेकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील दुसरी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या ओंकार मुंढेकर या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्यामुळे वाडीतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या मारहाण प्रकरणाबाबत सोमवारी शाळेत प्रशासन, शासन व ग्रामस्थांसमवेत दुपारी बैठक पार पडली. या बैठकीत शिक्षण सभापती विलास चाळके यांनी पंचायत समिती देवरुखच्या शिक्षण विभागाला संबंधित शिक्षकाची बदली करुन दोन दिवसात बदली शिक्षक देण्यात यावा, अशा सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषद शाळा, ओझरे मुंढेकरवाडी येथील शिक्षक शेखर देशपांडे याने दुसरीतील ओंकार संजय मुंढेकर याला मारहाण केली होती. हा प्रकार गुरुवारी घडला होता. मारहाणीमुळे या विद्यार्थ्याला वेदना होऊ लागल्याने ही घटना रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याचवेळी त्या विद्यार्थ्याला दवाखान्यात नेण्यात येऊन उपचार करण्यात आले. याबाबतची तक्रार विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी देवरुख पोलीस ठाण्यातदेखील शुक्रवारी दिली. दरम्यान शाळेतील दुसरीतील विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी वाडीतील ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यांनी मारहाण करणारा शिक्षक देशपांडे याचे निलंबन करावे, अशी मागणी शिक्षण विभागाकडे लावून धरली होती. निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी शनिवार शाळा बंद आंदोलनची भूमिका घेतली होती. तसेच शिक्षण विभागावर थडकण्याचा देखील निर्णय घेतला होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शाळेमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती विलास चाळके, जिल्हा परिषदेच्या वेदा फडके, ओझरे ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रवीण टक्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र गीते, सदस्या संतोष मुंढेकर, लक्ष्मण मुंढेकर, शांताराम मुंढेकर आदी ग्रामस्थांसह गटशिक्षणाधिकारी एस. डी. देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी सातपुते, शाळेच्या मुख्याध्यापिका कांगणे उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन या शिक्षकाची बदली करुन त्या ठिकाणी दुसऱ्या शिक्षकाची दोन दिवसात नियुक्ती करण्याचे तोंडी आदेश शिक्षण सभापती विलास चाळके यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच ग्रामस्थांनी या शिक्षकाचे निलंबन व्हावे, अशी मागणी रेटून धरली आहे. दोन दिवसात शिक्षक न मिळाल्यास आपले आंदोलन पुन्हा सुरुच राहील, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी) वस्तुनिष्ठ अहवाल देणार! दरम्यान गटशिक्षणाधिकरी एस.डी. देसाई यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, झाल्या प्रकाराचा वस्तुनिष्ठ अहवाल आपण वरिष्ठांकडे पाठवून देणार आहोत. त्यांचे निलंबन करण्याचे अधिकार हे आपल्या पातळीवरचे नाहीत.