शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सभापती, उपसभापतींना धक्का

By admin | Updated: October 7, 2016 23:50 IST

दापोली पंचायत समिती : ओणनवसे, साकुर्डे गण नवीन रचनेत बदलल्याने संधी हुकणार

दापोली : दापोली पंचायत समितीच्या विद्यमान सभापती दीप्ती निखार्गे आणि उपसभापती उन्मेष राजे यांचे अनुक्रमे ओणनवसे व साकुर्डे हे गण नवीन रचनेत बदलल्याने या दोघांनाही अन्य गणातून नशीब आजमावावे लागणार आहे. शहरातील रसिकरंजन नाट्यगृहात प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांच्या उपस्थितीत तहसीलदार कविता जाधव यांनी दापोली तालुक्यातील १२ पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर केली. एकूण १२ गणांपैकी ६ गणांवर महिला तर ६ गणांवर पुरूष उमेदवारांना संधी मिळणार आहे.राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य नीलेश जालगावकर यांचा टाळसुरे पंचायत समिती गणातही बदल झाल्याने त्यांना अन्य गणातून नशीब आजमावावे लागणार आहे. तालुक्यात पडलेले आरक्षण पुढीलप्रमाणे : - केळशी पंचायत समिती गण - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, अडखळ - अनुसूचित जमाती, पालगड - सर्वसाधारण, खेर्डी - नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, गिम्हवणे-सर्वसाधारण स्त्री, हर्णै -सर्वसाधारण, जालगाव- सर्वसाधारण, टेटवली - सर्वसाधारण स्त्री, असोंड -सर्वसाधारण स्त्री, उन्हवरे - सर्वसाधारण स्त्री, बुरोंडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग, दाभोळ - सर्वसाधारण. तालुक्यात यापूर्वीएकूण १४ गण होते. मात्र, नवीन रचनेनुसार ही गणसंख्या १२ झाली असून, साकुर्डे, ओणनवसे, आंजर्ले आणि टाळसुरे हे गण लोकसंख्येच्या निकषानुसार अन्य गणांमध्ये विभागले गेले आहेत. यामुळे या गणांमधून निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांना आता अन्य गणांमध्ये नशीब आजमावावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात अडखळ आणि टेटवली असे २ नवीन गण लोकसंख्येच्या निकषानुसार निर्माण झाले असून, येथे स्थानिक उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे. आरक्षण सोडत आणि गणरचना कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार एस. आर. कोरवी, महसूल नायब तहसीलदार श्वेता आल्हात, तहसीलदार कार्यालय निवडणूक अधिकारी, आदी उपस्थित होते. ही सोडत ऐकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात गर्दी केली होती. तालुक्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता पंचायत समिती निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)भगवान घाडगे पक्षापासून दूर : राजेंद्र फणसे, नीलेश जालगावकर अन्य मतदार संघाच्या शोधातकेळशी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा हुकुमी एक्का म्हणून परिचित असलेले आणि सध्या शिवसेनेपासून चार पावले लांब असलेले भगवान घाडगे हे २० वर्षांहून अधिककाळ येथून निवडून येत आहेत. मात्र, त्यांच्या गटातदेखील ओबीसी महिला आरक्षण पडल्याने भगवान घाडगे यांनाही नवीन गट शोधावा लागणार आहे. घाडगे यांचा लोकसंग्रह मोठा असून, त्यांचे अन्य पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. शिवसेनेत कोणताही निर्णय घेताना भगवान घाडगेंनी कौल दिल्याशिवाय पान हलत नव्हते. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीत घाडगे यांना पक्षापासून दूर ठेवण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतल्याने त्यांना मानणाऱ्या मतदारांची मते अन्य पक्षाकडे वळली होती. सध्या शिवसेना आणि घाडगे यांच्यामध्ये राजकीय कटुता आहे.पालगड जिल्हा परिषद गटात सर्वांना सोबत घेऊन काम करणारे शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे यांच्या गटातही ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्यांना आता अन्य गटातून उमेदवारी मिळवणे शक्य होते का, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहेतालुक्यात पूर्वी केळशी, पालगड, हर्णै, टाळसुरे, उन्हवरे, दाभोळ, जालगाव असे ७ जिल्हा परिषद गट होते. नवीन रचनेनुसार दाभोळपेक्षा बुरोंडीची लोकसंख्या वाढल्याने दाभोळ गटाचे नामकरण बुरोंडी जिल्हा परिषद गट झाले आहे. तर असोंडची लोकसंख्या उन्हवरेहून अधिक झाल्याने उन्हवरे गटाचे नामकरण असोंड जिल्हा परिषद गट असे झाले आहे. आता केवळ ६ जिल्हा परिषद गट अस्तित्वात आले आहेत. दरम्यान, केळशी जिल्हा परिषद गटात ओबीसी महिला, पालगड - ओबीसी महिला, हर्णै - सर्वसाधारण, जालगाव - सर्वसाधारण महिला, असोंड - नागरिकांचा मागास प्रवर्ग, बुरोंडी - सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. केळशी आणि पालगड वगळता पूर्वीच्या उन्हवरे आणि आत्ताच्या असोंड जिल्हा परिषद गटातील विनायक गायकवाड यांना या बदलाचा धक्का बसला. येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने त्यांचा पत्ता येथून कट झाला आहे.