शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भेटकार्ड्सचं माध्यम झालं दुर्मीळ

By admin | Updated: October 27, 2014 23:43 IST

मोबाईल एसएमएस : खरेदीकडे ग्राहकांची पाठ

फुणगूस : दिवाळी म्हणजे तेजाची पुजा, मांगल्याची निर्मल बरसात! मानवी भावबंध जोडणाऱ्या संस्कृ तीचा भक्कम पूल, केवळ पणत्यांची आरास म्हणजे दिवाळी नाही तर या सणामागचा दिव्य शुभ संदेश प्रत्येकाला देण्याचे एक माध्यम आहे. परंतु सध्या मोबाईलचे युग असल्यामुळे ग्रीटींग कार्डऐवजी मोबाईल इंटरनेटवरुन ‘एसएमएस’ केले जातात. साहजिकच भेडकाडर््सचा जमानाच आता संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळे पूर्वी हजारोंच्या संख्येने पोस्टामार्फ त दाखल होणारी भेटकाडर््स आता शेकडोवर येऊन पोहोचली आहे.दिवाळीचा सण तोच. आनंदही तोच आहे. मात्र, काळानुरुप साजरा करण्याच्या प्रथा बदलल्या आहेत. आनंदाची परिमाणे बदलली. मात्र, आनंद वेगवेगळ्या प्रथा परंपरेनुसार साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. मात्र, सणांचे औत्सुक्य आणि उत्साह तोच आहे. या सणानिमित्ताने प्रत्येकाच्या आयुष्यात तेजाची, मांगल्याची पहाट उगवावी, यासाठी एकमेकांना शुभ संदेश पाठवण्याची प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे. व्यापारी आपल्या ग्राहकांना, मित्र आपल्या मैत्रिणींना, नातेवाइक आपल्या नातेवाइकांना भेटकार्डच्या स्वरुपात आपला संदेश पोहोचवतात. मात्र, सध्या मोबाईलचे युग आल्यामुळे एसएमएसद्वारे अथवा व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक मॅसेंजरद्वारे संदेश पाठविण्यावरच सर्वांचा भर आहे. त्यामुळे भेटकार्ड पडद्याआड गेली आहेत. सध्या पोस्ट कर्मचाऱ्यांचीही धावपळ वाचली आहे. बाजारात भेटकार्ड आकर्षक स्वरुपात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, त्यांना मागणी कमी असल्याने भेटकाडर््सच्या किमतीही कमी ठेवण्यात आल्या होत्या. तरीही इंटरनेट व मोबाईल एसएमएसकडे लोकांचा कल असल्याने दिवाळीसाठीची भेटकार्ड लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. (वार्ताहर)