शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बछड्याला मिळाली आईच्या मायेची उब !

By admin | Updated: August 24, 2014 00:41 IST

वन अधिकाऱ्यांचा प्रयोग यशस्वी

अयोध्याप्रसाद गावकर, पुरळ : माणूस असो की जनावर. आईची माया सारखीच असते याची प्रचिती शनिवारी वाडा येथे आली. काल विहिरातून मुक्त केलेल्या बछड्याला त्याच्या आईने म्हणजेच मादी बिबट्याने शोधून काढून सोबत नेले.काल, शुक्रवारी सकाळी वाडा येथील माई परब यांच्या माड बागायतीमधील विहिरीमध्ये सुमारे तीन महिन्यांचा बिबट्याचा बछडा पाण्यामध्ये घायाळ अवस्थेत आढळला होता. या बछड्याला वनअधिकारी व ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून बाहेर काढले होते. यानंतर वन अधिकाऱ्यांनी या बछड्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर प्रथमोपचार केले. बछडा लहान असल्याने त्याला भक्ष्य मिळविणे शक्य नसल्याने त्याला त्याच्या आईच्याच ताब्यात देणे महत्त्वाचे होते. वन अधिकाऱ्यांनी मिळालेल्या ठिकाणी बछड्याला एका छोट्या पिंजऱ्यामध्ये ठेवले. पिंजऱ्याच्या दरवाजाला दोरी बांधून तेथीलच जवळ असलेल्या पंपशेड इमारतीमध्ये ती दोरी हातात घेऊन वन अधिकारी दडून बसले होते. रात्री पावणेदोनच्या सुमारास बछडा पडलेल्या विहिरीजवळ बिबट्या मादी येऊन आपल्या बछड्यासाठी गुरगुरू लागली. हा आवाज ऐकून त्या बछड्याने आईला प्रतिसाद दिला आणि बछडा पिंजऱ्यामधून मुक्तता होण्यासाठी धडपडू लागला. ही गोष्ट वन अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने बछड्याला आईच्या ताब्यात देण्यासाठी त्यांनी पिंजऱ्याच्या दरवाजाची दोरी खेचून बछड्याची मुक्तता केली. बछडा आईसोबत निघून गेला. वन अधिकाऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी घडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. ं