शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्या करताहेत जास्त दराने धान्य खरेदी

By admin | Updated: August 3, 2016 00:48 IST

संगमेश्वर तालुका : धान्याचा पुरवठा न झाल्याचा फटका

 फुणगूस : रास्तदर धान्य दुकानदारांच्या मागणीप्रमाणे पुरवठा विभागाकडून धान्याचा पुरवठा न झाल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्यांना धान्याची उपलब्धता होत नाही. यामुळे बालकांना पोषण आहार देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना बाजारातून जास्त दराने धान्य खरेदी करून आहार द्यावा लागतो. प्रशासनाच्या चुकीचा फटका अंगणवाडीसेविका व बचत गटांना सहन करावा लागतो. जानेवारी ते जून या महिन्यांचे धान्य अंगणवाडीसेविका व बचत गटांना मिळालेले नाही. यामुळे अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रास्तदर धान्य दुकानांशी वारंवार संपर्क साधला असता काही अंगणवाड्यांचे धान्य प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येते. यामध्ये देवरूख परिसरातील अंगणवाड्यांचा समावेश आहे ज्यांना धान्यच मिळतच नाही. याबाबत तालुका पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध न झाल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तालुक्यातील ७८ क्विंटल तांदळाची मागणी असताना केवळ ६० क्विंटल तांदूळ प्राप्त झाला आहे. आलेल्या तांदळाप्रमाणे वाटप करताना अंगणवाड्यांचे धान्य राखून ठेवले आहे. फरकाच्या तांदळाची मागणी नवीन महिन्याच्या मागणीप्रमाणे केली आहे. यानुसार धान्य आल्यास दोन दिवसातच अंगणवाड्यांना धान्याचा पुरवठा करण्यात येईल. तोपर्यंत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार शिजवून देताना अंगणवाडीसेविका तसेच बचत गटांच्या महिलांना खुल्या बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. त्यासाठी जादा रक्कम खर्च होत आहे. बालकांना उपाशी राहावे लागू नये, यासाठी हा आहार शिजवण्यासाठी पदरमोड करावी लागते, तरी लवकरच धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर) नाहक मनस्ताप : शासनातर्फे मोफत पोषण आहार योजना ४मागणीप्रमाणे पुरवठा विभागाकडून पुरवठा नाही. ४जानेवारी ते जून महिन्यांचे धान्य मिळालेलेच नाही. ४बालकांना पोषण आहार देण्यासाठी अनेक अडचणी. ४धान्याचा पुरवठा करण्याची मागणी. राज्य शासनातर्फे शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहार दिला जातो. यासाठी अंगणवाड्यांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील अंगणवाड्यांना धान्य पुरवठाच न झाल्याने येथील अंगणवाडीसेविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.