शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मंडप सजावटीतून व्यवसाय संधी

By admin | Updated: October 16, 2015 00:07 IST

स्वामी समर्थ बचत गट, कोलेवाडी

स्वामी समर्थ बचत गटाचे नेतृत्व करणाऱ्या या बचत गटाच्या अध्यक्षा कल्पना केसरकर यांना देवरूख नगरपंचायतीच्या पहिल्या नगरसेविका असे पद भुषविण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे या बचत गटाच्या विकासाला आता अधिकच दिशा मिळणार आहे. देवरूखनजिकच्या कोलेवाडीसारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेल्या या बचत गटाच्या सर्व सदस्यांना आपल्या परिसरातील विकासाचे स्वप्न पूर्ण करावयाचे आहे. त्यादृष्टीने या महिला आत्मनिर्भर झाल्या असून, गावालाही स्वयंपूंर्ण करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.छोट्याशा गावांमध्येही आता महिला बचत गटाचे कार्य चांगल्या प्रकारे करू लागल्या आहेत. खेडेगाव स्वयंपूर्ण होण्यामध्ये अशा महिला बचत गटांचे कार्य महत्वपूर्ण ठरू लागले आहे. गावच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या महिला ते पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत. स्वावलंबनातून आत्मनिर्भरतेकडे त्यांची वाटचाल जोमाने सुरू आहे. देवरूखनजिकच्या कोलेवाडी येथील स्वामी समर्थ महिला बचत गटही ग्रामीण भागातील सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मंडप सजावट आणि कॅटरिंगसारख्या वेगळ्या व्यवसायात आज भक्कमपणे पाय रोवून उभा आहे.कल्पना चंद्रकांत केसरकर यांच्या नेतृत्वाखाली १४ जुलै २००६ रोजी स्वामी समर्थ बचत गटाची स्थापना झाली. या बचत गटाच्या सचिव अनिता खेडेकर, खजिनदार दामिनी खेडेकर, आणि सदस्या संपदा खेडेकर, अनुसुया बडद, शुभांगी बडद, शेवंती पड्याळ, वनीता खेडेकर, सुमित्रा वडद, सुनीता खेडेकर, सुनंदा भालेकर, द्रौपदी भालेकर अशा १२ जणींचा समावेश आहे. सुरूवातीला सदस्यांच्या अडचणी आणि गरजांसाठी मासिक वर्गणीतून अर्थसहाय्य उभे करण्याचा हेतू होता. यातूनच विविध व्यवसाय करण्याची कल्पना पुढे आली आणि या बचत गटाने अगरबत्ती बनवणे, साबण पावडर, लिक्वीड सोप, फिनेल आदी वस्तूंचे प्रशिक्षण घेऊन त्यांचे उत्पादन करण्यास सुरूवातही केली. त्यासाठी देवरूख येथील स्टेट बँकेकडून २५ हजार रूपयांचे अर्थसहाय मिळाले. मात्र, या व्यवसायातून त्याची यशस्वी परतफेडही झाली. हे करत असताना काहीतरी वेगळा मोठा व्यवसाय करायला हवा, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. सर्व सदस्यांनी बैठक घेतली. ग्रामीण भागात लग्नसोहळ्यांसाठी लागणाऱ्या मंडपाची सजावट बाहेरून करावी लागते. त्यासाठी होणारा खर्चही सामान्यांच्या आवाक्यापलिकडचा असतो. त्यामुळे मंडप सजावटीचा व्यवसाय केला तर, येथील लोकांना त्यांच्या ऐपतीनुसार ही सुविधा उपलब्ध करून देता येईल असा विचार पुढे आला. त्याला सर्व सदस्यांचा एकमुखी होकारही आला. या व्यवसायाच्या जोडीलाच कॅटरिंगचा व्यवसायही पूरक असल्याने तो केल्यास त्यातून चांगले अर्थार्जनही होऊ शकेल. त्यामुळे यासाठी लागणारे सामान खरेदी करण्याचा निर्णयही याच बैठकीत झाला. झालं, त्याच्या पूर्ततेच्या दृष्टीने सर्व सदस्यांची हालचालही सुरू झाली. देवरूखच्या स्टेट बँकेचा आर्थिक हातभार मिळतच होता. याहीवेळी या बचत गटाने प्रस्ताव सादर करताच बँक अधिकाऱ्यांनी या बचत गटाला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचा प्रस्ताव मंजूरही केला. या बँकेने दिलेल्या ३२ हजार रूपयांच्या अर्थसहाय्यातून या महिलांचा व्यवसाय सुरू झाला. या महिला परिश्रमाने हा व्यवसाय चालवत आहेत. साहजिकच विविध कार्यक्रम, लग्नाचा हंगाम यावेळी मंडप सजावटीला आजुबाजूच्या गावातून मागणी असते. व्यवसाय आता चांगलाच स्थिरावला असून, यातून बँकेच्या कर्जाचा हप्ता आपोआपच जातो. आता कुठेही कार्यक्रम असो, लग्न असो, स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या मंडपाला सतत मागणी असते. यातूनच आता चांगला फायदाही होत आहे. त्यामुळे महिलांच्या बचतीवर त्याचा परिणामही होत नाही. त्याचबरोबर इतरांनाही यातून रोजगार उपलब्ध होत आहे.या बचत गटाच्या आगळ्यावेगळ्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘स्वर्ण ग्रामीण रोजगार’ योजनेअंतर्गत या बचत गटाला एक लाख रूपयांचे अनुदानही मिळाले आहे. या बचत गटाच्या वाटचालीत देवरूख येथील मातृमंदिर संस्थेचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. मातृमंदिर बचत गट महासंघाच्या कार्यकर्त्या, स्टेट बँक आॅफ इंडिया, देवरूख तसेच देवरूख पंचायत समितीच्या सहकार्यानेच आपण यशस्वी वाटचाल करू शकलो, असे मत या सर्व सदस्या व्यक्त करतात. कष्टकरी महिलांना एकत्र आणून कल्पना केसरकर यांनी मंडप सजावटीसारख्या वेगळ्या व्यवसायात चांगलेच यश संपादन केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून या महिला खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. आत्मनिर्भर आणि धीट बनल्या आहेत. यामुळे त्यांच्यातील एकोपाही तेवढाच जोपासला जातोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने सबलीकरणाकडे झेपावणाऱ्या या महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान कायमस्वरूपी विलसत आहे. - शोभना कांबळेआमच्या बचत गटाने शेळी पालनाचे युनिट घेऊन दुग्ध व्यवसायही केला आहे. मंडप सजावट तसेच विविध व्यवसायातून दरवर्षी सुमारे दीड लाख रूपयांची उलाढाल सहजच होते. या भागात किरकोळ जिनसांचे दुकान नाही. त्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून असे दुकान सुरू करण्याचा विचार आहे. दुकान सुरू केल्यास आजुबाजूच्या अनेक वाड्यांना त्याचा उपयोग होणार आहे. आमच्या सदस्यांनाही रोजगार मिळेल, त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय.- कल्पना केसरकर, अध्यक्ष