शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन : दापोली आगारात परिवहनमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 12:51 IST

सातवा वेतन आयोग आणि हंगामी पगारवाढीच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यानी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील दहा आगारांमध्ये एक हजार ७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेऱ्या सकाळी झाल्या. त्यानंतर शंभर टक्के बसेस बंदच होत्या. यामुळे जिल्ह्यातील आगारांचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.

ठळक मुद्देचालक-वाहक संपकरी कर्मचाऱ्यांनी केला निषेधराष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखलएसटी कर्मचा-यांचं काम बंद आंदोलन, प्रवाशांचे हाल

दापोली (रत्नागिरी) , दि. १८ :  दापोली एसटी आगारात संतप्त चालक-वाहक संपकरी कर्मचाऱ्यानी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसहीत अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्याविरोधात दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दापोली आगारातील एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्याना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम दापोली येथील आगारात दाखल झाले. संतप्त संपकरी कर्मचाऱ्यानी दिवाकर रावते यांचा निषेध नोंदवत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी आमदार संजय कदम उपस्थित होते.

संपकरी कर्मचाऱ्यासमवेत रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यामुळे दापोली पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना होणारा त्रास पाहून लवकर संप मिटावा यासाठी आपण तेथे गेलो होतो , मात्र सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकून आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र लोकांच्या हिताकरीता आपण असे शेकडो गुन्हे अंगावर घेवू अशी प्रतिक्रिया आमदार संजय कदम यांनी लोकमतशी बोलताना दिली .दरम्यान, एसटी कामगारांना पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने बुधवारीही प्रवाशांचे हाल सुरु आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संप