शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

उखडलेले रस्ते; पाणीटंचाई कायम

By admin | Updated: November 17, 2014 23:26 IST

नव्या सरकारकडून अपेक्षा : बेरोजगारी कमी करण्याची गरज; औद्योगिक वसाहतीकडे दुर्लक्ष--रेंगाळलेले प्रश्न

सुभाष कदम -चिपळूण -कोकणची सांस्कृतिक राजधानी व रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय केंद्र म्हणून ओळख असणारा चिपळूण तालुका आजही अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहे. येथील राज्यकर्त्यांनी विकासाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी शहरापासून गावापर्यंत कोठेही नजर टाकली तरी येथील रस्ते उखडलेले आहेत. तालुक्यात १८ गावांतील ४६ वाड्यांमध्ये आजही पाण्याची तीव्र टंचाई भासते. धनगरवाड्यांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते. हे वास्तव नाकारुन चालणार नाही. चिपळूण तालुक्यात १६७ गावे आहेत. १३० ग्रामपंचायती कार्यरत आहेत. हा तालुका चिपळूण व गुहागर विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. तालुक्यात १८ पंचायत समिती सदस्य व ९ जिल्हा परिषद सदस्य कार्यरत आहेत. रस्त्यावरुन गावाची ओळख पटते. सर्वच गावातील रस्त्यांची आज दुरवस्था झाली आहे. शासनाकडून डागडुजीसाठी निधी नाही. जे नवीन रस्ते होतात ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ती कामे टिकत नाहीत. त्यामुळे रस्त्यांची अडथळ्यांची शर्यत कायम आहे. उन्हाळ्यात चिपळूण तालुक्यात दरवर्षी अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई भासते. अनेक नळपाणी योजना शोभेच्या ठरल्या आहेत. धनगरवाड्या आजही तहानलेल्या आहेत. गेल्या वर्षी १८ गावांतील ४६ वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. दरवर्षी टंचाईग्रस्त गावांमध्ये घट होण्याऐवजी वाढ होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. शासन कोट्यवधी रुपये नळपाणी योजनांवर खर्च करते. परंतु, नियोजनाचा अभाव व निकृष्ट कामामुळे योजनांचा बोजवारा उडतो. शासकीय अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष असल्याने लोक पाण्यापासून वंचित आहेत. परशुराम मंदिर, गोवळकोट, कालुस्ते, मजरेकाशी येथील खाडीकिनारा, तुरंबव येथील शारदेचे मंदिर, तिवरे येथील गंगा, गोवळकोट येथील गोविंदगड, कुंभार्ली घाट, टेरव येथील भवानी मंदिर यासह अनेक सुंदर मंदिरे व पर्यटनस्थळे या तालुक्यात आहेत. येथे सुंदर बाजारपेठ आहे. शिवाय राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था असल्याने पर्यटक येथे वास्तव्य करणे पसंत करतात. परंतु, चांगले रस्ते व पर्यटनस्थळांची दुरवस्था असल्याने पर्यटक येथे यायला धजावत नाहीत. शासनाने या तालुक्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करणे गरजेचे आहे. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. खेर्डी येथे जिल्ह्यातील पहिली औद्योगिक वसाहत उभारली आहे. परंतु, आज या ठिकाणी उद्योगांपेक्षा राहती घरेच वाढली आहेत. गाणेखडपोली येथेही औद्योगिक वसाहत आहे. या दोन्ही वसाहतींचे नूतनीकरण करून नवीन उद्योग येथे आल्यास बेरोजगारीवर मात करणे शक्य होईल. तालुक्यात कामथे उपजिल्हा रुग्णालय व ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तेथे आधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास आरोग्याचा प्रश्न कायमचा सुटेल. कचऱ्याचा प्रश्न कायमचिपळूण शहरासह लगत असलेल्या गावांमध्ये रस्त्यालगत कचरा टाकला जातो. घनकचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राबवून कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी स्वायत्त संस्थांना शासनाने सहकार्य करायला हवे.दूषित पाणी...चिपळूण तालुक्यात आजही साथीचे आजार पसरतात. दूषित पाण्यामुळे रोगराई होते. वहाळ, दादर, सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या अनेक गावात दूषित पाणी असते. आॅक्टोबरअखेर ३० गावांमधील पाणी दूषित असल्याचे आढळून आले. उद्यानांची दुरवस्था...चिपळूण शहरात एकही मोठे उद्यान किंवा क्रीडा संकुल नाही. शहरात असणाऱ्या उद्यानांची दुरवस्था झाली आहे. जे क्रीडा संकुल आहेत तेथे सोयीसुविधांचा अभाव आहे. नगर परिषदेच्या शहर विकास आराखड्याची अंमलबजावणी व्हायला हवी. गणेशोत्सवात तारांबळकोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावेळी गावात घरोघरी मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त दाखल होतात. याच काळात रस्त्यांवर अधिक खड्डे पडलेले असतात. पावसामुळे रस्त्यांवरील डांबर धुपून जाते व खडी वर येते. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. त्यामुळे खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. पाऊस मोठ्या प्रमाणावर असल्याने खड्डे बुजविणे अवघड होते. तालुक्याचे विभाजन आवश्यकतालुक्यात चिपळूण शहर, सावर्डे, शिरगाव येथे पोलीस ठाणे आहेत. पण, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायला हवी. खरवते, दहीवली येथील कृषी महाविद्यालयाजवळ क्रीडा संकुल होणार आहे. सावर्डे येथे बाजारपेठ वाढत असून, स्वतंत्र तालुका म्हणून सावर्डे परिसर अस्तित्वात येऊ शकतो. तालुक्याचे विभाजन केल्यास आता होणारा प्रशासकीय ताण कमी होईल व सावर्डे परिसरातील गावांचा झपाट्याने विकास होईल. त्यासाठी तालुका विभाजन होणे आवश्यक आहे. कारखाने भकास...औद्योगिक वसाहतीतील अनेक कारखान्यांचे केवळ सांगाडे उभे आहेत. त्यांची यंत्रे गंजली आहे. काही कारखान्यांची पडझड झाली असून हे कारखाने बंद अवस्थेत आहेत. अनेक प्लॉट फक्त निवासी कारणासाठी वापरले जात आहेत.