शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बजेट कोलमडलेलेच

By admin | Updated: September 14, 2014 23:54 IST

आठवड्यात दर दुप्पट : भाज्यांचे दर अजूनही महाग

रत्नागिरी : दररोजच्या आहारात भाजीपाला शिजवला जातो. परंतु भाजीपाल्याचे दर पुन्हा कडाडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मटारच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. २०० रूपये किलो दराने मटारची विक्री सुरू आहे. गेल्या आठवड्यात २० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू होती. मात्र, या आठवड्यात त्याच टोमॅटोचा दर दुप्पट झाला आहे. ४० रूपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू आहे.आहारात पालेभाज्या किंवा भाज्यांचा प्रामुख्याने वापर करण्याची आवश्यकता असताना भाज्यांचे दर मात्र कमालीचे वाढले आहेत. कोबी ३० रूपये, वांगी ४० रूपये, सिमला मिरची ६० रूपये, फरसबी ६० रूपये, गवार ६० रूपये, फ्लॉवर ५० रूपये, हिरवी मिरची ६० रूपये, भेंडी ७० रूपये, काकडी ४० रूपये, बीट ४० रूपये, गाजर ६० रूपये, घेवडा ६० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. मेथी, पालक, शेपू, चवळी, माठ जूडी १५ रूपये दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबीर जूडी २० रूपये दराने विकण्यात येत आहे.गावठी भाज्यादेखील बाजारात विक्रीस येऊ लागल्या आहेत. भोपळ्याची शेड १० ते १५ रूपये दराने विकण्यात येत आहे. दोडके, पडवळ यांची २० ते २५ रूपये नग दराने विक्री सुरू आहे. दुधी भोपळा ३० ते ३५ रूपये दराने विकले जात आहेत. शिवाय छोट्या काकड्यांची २० रूपये वाटाप्रमाणे विक्री सुरू आहे. मोठ्या काकड्या ४० रूपयांपासून १२० रूपयांपर्यंत विकण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून महिला गावठी भाज्या विक्रीला आणतात. त्यामुळे शहरातील नाकानाक्यावर भाजी विके्रत्या दिसून येत आहेत. भेंडीची १५ रूपयाने ३ जुड्या विकण्यात येत आहेत.मटारच्या दराने उच्चांक गाठला आहे. ५० रूपये पाव किलो दराने मटार विकण्यात येत आहेत. कोवळा मटार असून, दरही वधारलेला आहे. बहुतांश ग्राहक फ्रोजन मटार खरेदी करत आहेत. टोमॅटोचा वापर नियमित केला जातो. ४० रूपये किलो दराने टोमॅटो विक्री सुरू आहे. भाज्यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणी वर्गाचे हाल होत आहेत.गत आठवड्यात २० रूपये किलो दराने विक्री होती. परंतु या आठवड्यात दुप्पट वाढ झाली आहे. कांदा ३० ते ४० रूपये, तर बटाटा ४० रूपये किलो दराने विकण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)सामान्यांवर परिणाम भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले.आठवड्यात दुपटीने दर वाढले.एकदम दर वाढण्याचे कारण गुलदस्त्यात.पालेभाज्या महागल्या तर करायचे काय हा गृहिणींसमोर प्रश्न.कोबी, वांगी, फरसबी महाग.पितृपक्षात महागाईने केला कहर.ग्रामीण भागातून महिला येतात काकड्या चिबूड घेऊन गावठी भाज्यांना मागणी वाढतेय .मटार २०० रूपये किलोटोमॅटो ४० रूपये किलो