अडरे : चिपळूण तालुका बौध्दजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमांक १ यांच्या वतीने शाखा अध्यक्ष सिध्दार्थ परशुराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे नियम पाळून बुद्ध जयंती व बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांच्या हस्ते धम्म ध्वज फडकविण्यात आला. शंकरभाऊ जाधव, अध्यक्ष सिध्दार्थ जाधव, राजेंद्र जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महेंद्र जाधव व मयुरी महेंद्र जाधव यांनी पुष्पहार अर्पण केले. पूजापाठ, सूत्रपठन धम्म कमिटीचे माजी अध्यक्ष प्रभाकर सकपाळ यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी राजू जाधव, प्रभाकर सकपाळ, अध्यक्ष सिध्दार्थ परशुराम जाधव यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर मोहिते यांनी केले.