शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीसाठी तरूण पुढे यावेत

By admin | Updated: September 11, 2014 23:12 IST

प्रशांत चव्हाण : ‘जयपूर पिंक’च्या खेळाडूचा गौरव

चिपळूण : क्रिकेटला सर्वच स्तरातून प्रोत्साहन मिळत आहे. मात्र, लाल मातीतला कबड्डी खेळ हा मातीत राहिला. आता राष्ट्रीय स्तरावरदेखील या खेळाला रसिकांकडून प्रतिसाद मिळत असल्याने या खेळात तरुण खेळाडूंनी पुढे यायला हवे, असे प्रतिपादन जयपूर संघातील खेळाडू व मार्गताम्हाणेचा सुपुत्र प्रशांत चव्हाण यांनी येथे केले. जयपूर पिंक पँथर संघातून अभिनेते अभिषेक बच्चन यांच्या संघात खेळण्याची संधी प्रशांत याला राष्ट्रीय स्तरावर मिळाली. मनाली भोबस्कर हिने स्वागत गीत सादर केले. त्याबद्दल सुशील वेल्हाळ यांच्यातर्फे बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.जयपूर टीममधून चव्हाण याने खेळताना अप्रतिम कामगिरी करताना कोकणचे नाव उज्ज्वल केले. चव्हाण यांनी यापुढे झेप घ्यावी व जगात असेच चमकत राहावे, असे आवाहन कदम यांनी आपल्या भाषणात केले. माजी सभापती नंदकिशोर पवार यांनीही चव्हाण यांच्या रूपाने लाल मातीची शान अधिक वाढल्याचे मत व्यक्त केले. चव्हाण यांच्या क्रीडाकौशल्याचे पवार यांनी कौतुक केले. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मार्गताम्हाणे महिला मंडळातर्फे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती नीलम गोंधळी, अनिलकुमार जोशी यांच्या हस्ते काँग्रेसचे प्रवक्ते प्रभाकर जाधव, मार्गताम्हाणे एज्युकेशन सोसायटी, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनतर्फे प्रशांत याचा सत्कार करण्यात आला. संजय कराडे, प्राची जाधव, मनीषा भोबस्कर यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मोहन चव्हाण यांनी केले. दीपक देवकर यांनी सूत्रसंचालन केले. अजित साळवी यांनी आभार मानले.यावेळी राज्य कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश कदम, माजी सभापती नंदकिशोर पवार, विजया नातू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुशील वेल्हाळ, कबड्डीपटू प्रताप शिंदे, यशवंत गोंधळी, चंद्रकांत चव्हाण, प्रताप चव्हाण, नीलेश चव्हाण, मनोहर चव्हाण, जयसिंग मोरे, मोहन चव्हाण, नीलम गोंधळी, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर नार्वेकर, उपसरपंच सीताराम घाणेकर, अजित साळवी, मुख्याध्यापक संदीप गोखले आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)चव्हाण याने कबड्डीची सुरुवात ओम कबड्डी संघ, कल्याण येथून केली. नांदेड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून दिले. अमरावती येथे राज्याला २८ वर्षांनी कबड्डी स्पर्धेत विजय मिळवून दिला. २००७ ते २०११ राज्य कबड्डी संघाचे नेतृत्व केले असून, त्याला जयपूर पिंक पँथर संघातून राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. कबड्डीपटू प्रशांत चव्हाण यांचे चिपळूण येथे आगमन झाल्यानंतर बहादूरशेख नाक्यापासून वाजतगाजत फटाक्यांची आतषबाजी करुन मार्गताम्हाणेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मालघर, तांबी, रामपूर येथेही त्याचा सत्कार करण्यात आला. मार्गताम्हाणे येथे पद्मावतीचे दर्शन घेऊन शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.