शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाच्या भेंगांनी उडवली धावपळ

By admin | Updated: July 16, 2017 18:06 IST

यंत्रणा जागी : पूलाला धोका नसल्याचा अभियंत्यांचा निर्वाळा

आॅनलाईन लोकमतलांजा (जि. रत्नागिरी), दि. १५ : मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड येथील पुलावर भेगा पडल्याचे वृत्त कळताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आणि सर्वांचीच धावपळ उडाली. मात्र, या भेगांपासून पुलाला कोणताही धोका नसल्याचे ‘मुंबई एन्ट्री पॉर्इंट’ या कंपनीचे अभियंता दत्तात्रय कदम यांनी सांगितले.वाकेड पुलावर भेगा पडल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. लांजा बसस्थानक नियंत्रक दिलीप वाडेकर यांनी लांजा पोलिसांना याची पूर्वकल्पना दिली. त्यानुसार पोलिसांनी तहसीलदार मारूती कांबळे यांना पुलाला भेगा पडल्याची खबर दिल्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांगरीकर, हेडकॉन्टेबल संतोष झापडेकर, वाकेड सरपंच जयश्री भितळे, पोलीसपाटील जयवंत जाधव, माजी सरपंच गोपाळ सावंत, ग्रामसेविका आर. व्ही. घाग, संदेश जाधव उपस्थित होते.

वाकेड पुलावर भेगा पडल्याचे दिसल्याने तहसीलदार कांबळे यांनी लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाची देखभाल करणाऱ्या ‘मुंबई एन्ट्री पॉर्इंट’ या कंपनीकडे संपर्क साधला. त्यानुसार कंपनीचे अभियंता दत्तात्रय कदम व सहकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देत पुलाची पाहणी केली. यावेळी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावरील भागालाच भेग पडल्याचे निदर्शनास आले. मात्र, या भेगेचा पुलाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. महामार्गावरील या पुलाचे पंधरा वर्षापूर्वी सहा ते सात फूट रुंदीकरण करण्यात आले होते. हे रुंदीकरण व जुन्या पुलाचे डांबरीकरण एकजीव न झाल्याने दहा ते बारा फुटांपर्यंत ही भेग गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महाड सावित्री नदीवर गेल्यावर्षी झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र हादरून गेला होता. वाकेड पुलावर भेगा पडल्याचे समजताच काहींनी महाड दुर्घटनेच्या आठवणी जाग्या केल्या. मात्र, संबंधित कंपनीच्या अभियंत्यांनी वाकेड पुलाला कोणताही धोका नसल्याचे सांगताच प्रशासनासह प्रवाशांचा जीवही भांड्यात पडला.