शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दिविनायक ट्रस्टच्या निधीतून बंधाऱ्यांची कामे

By admin | Updated: March 5, 2016 00:01 IST

नरेंद्र राणे : जलयुक्त शिवाराला मिळणार बळकटी

रत्नागिरी :जलयुक्त शिवार अभियानासाठी मुंबई येथील सिध्दिविनायक ट्रस्टने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीतून जिल्ह्यात १४ बंधाऱ्यांची कामे सुरु करण्यात आल्याची माहिती सिध्दिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली़पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार हे महत्त्वाकांक्षी अभियान संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर सिध्दिविनायक ट्रस्टतर्फे प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी याप्रमाणे राज्यातील ३४ जिल्ह्यांना एकूण ३४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. गतवर्षी ट्रस्टतर्फे रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला़ दरम्यान, बंधाऱ्यांबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या कामांना आता प्रत्यक्षात सुरूवात करण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले़रत्नागिरी जिल्ह्यात बांधण्यात येत असलेल्या १४ बंधाऱ्यांपैकी ७ सिमेंटचे, तर ७ वळण बंधाऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथे २१ लाख १० हजार रुपये खर्च करून १ सिमेंटचा, तर २ वळण बंधारे बांधण्यात येणार आहेत़ लांजा तालुक्यात विवली येथे १ सिमेंटचा, तर ४ वळण बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी २० लाख ३९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. खेड तालुक्यातील हेदली येथे २ सिमेंटचे व १ वळण बंधारा बांधण्यात येणार असून, त्यासाठी २७ लाख २६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. खवटी येथे २ सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहेत. दापोली तालुक्यातील लाडघर येथे १२ लाख ८० हजार रुपये खर्च करून सिमेंटचा बंधारा बांधण्यात येणार आहे.सर्व बंधाऱ्यांच्या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून, या कामांना आता सुरूवात करण्यात येत असल्याचे राणे यांनी सांगितले. या बंधाऱ्यांच्या कामांसाठी १९ लाख रुपये अतिरिक्त निधी ट्रस्टने उपलब्ध करून दिला असल्याचेही राणे म्हणाले़रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी सिध्दिविनायक ट्रस्टतर्फे १० लाख रुपयांची शैक्षणिक पुस्तके उपलब्ध करून दिल्याचेही राणे यांनी सांगितले. यावेळी सिध्दिविनायक ट्रस्टचे विश्वस्त सतीश पाडावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ए. जी. शहा, सहायक जिल्हा माहिती अधिकारी विजय कोळी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)सिध्दिविनायक ट्रस्टतर्फे आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा रूग्णालयाला अर्थसहाय्य करण्यात आले आहे़ जिल्हा रूग्णालयाला ४ डायलेसिस मशीन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी २५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे़ तसेच १ आरओ प्लांट उभारण्यासाठी १२ लाख खर्च करण्यात येणार आहेत़