शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शिक्षण संस्था; कायदा कडक हवा

By admin | Updated: July 17, 2014 23:54 IST

अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास

चिपळूण : विविध आमिषे दाखवून करिअरच्या नावाखाली विद्यार्थ्यांची लूट करणाऱ्या शिक्षण संस्थांना चाप बसावा, यासाठी बोगस शिक्षण संस्था प्रतिबंधक कायदा वर्षभरापूर्वी करण्यात आला. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अनेक शिक्षणसम्राटांनी खासगी संस्था स्थापन करुन विद्यार्थ्यांची लूट सुरु केली आहे. याचा विचार करुन या शैक्षणिक संस्थांना चाप बसावा, त्यांच्यावर शासनाचा अंकुश राहावा, यासाठी सरकारने बोगस शिक्षण संस्था प्रतिबंधक कायदा केला. या कायद्यात नियामक संस्थांच्या मान्यतेशिवाय चालवलेले अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास सक्षम प्राधिकारणमार्फत दखल घेणे, सक्षम आणि अपिलीय अधिकाऱ्यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार, दोषींना १ ते ५ वर्षांपर्यंत दंड तसेच १ वर्षाची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहे. ११ जुलै २०१३ रोजी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था आणि अभ्यासक्रम पायबंद अधिनियम आणला आहे. गेल्या वर्षभरात बोगस संस्था विद्यार्थ्यांना विविध आमिष दाखवून लूटत आहेत. तरीही वर्षभरात एकाही संस्थेवर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या सरकारने कायदे केले त्या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच सक्षम नसल्याने विद्यार्थ्यांची पर्यायाने पालकांची लूट सुरूच आहे. (प्रतिनिधी)