शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रायपाटण येथे तरुणाचा जळालेला मृतदेह

By admin | Updated: January 22, 2017 23:30 IST

राजापूर तालुक्यात खळबळ : गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज

राजापूर/पाचल : ओणी-अणुस्कुरा मार्गावरील रायपाटण खिंडीत सुमारे वीस ते पंचवीस वर्षीय तरुणाचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून तरुणाचा गळा आवळून खून झाला असावा आणि नंतर त्याला जाळले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसली तरी तो रायपाटण परिसराबाहेरचा असावा, असा अंदाज आहे.रविवारी सकाळी सातच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. एका ट्रॅक्टर चालकाने रायपाटणच्या खिंडीत एक मानवी देह जळत असल्याचे पाहिले व त्यानंतर त्याने रायपाटणचे सरपंच राजेश नलावडे यांना माहिती दिली. त्यानंतर नलावडे व पोलिस पाटील महादेव नेवरेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन खात्री करून घेतली व तत्काळ राजापूर पोलिस ठाण्यात संपर्क साधला.त्यानंतर रायपाटण पोलिस दूरक्षेत्रावरील पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यावेळी खिंडीतील रस्त्याच्या बाजूला गटारात एक मृतदेह जळत असल्याचे निदर्शनाला आले. सुरुवातीला पोलिसांनी जळत असलेला मृतदेह विझवला. तो मोठ्या प्रमाणावर जळाला होता. चेहऱ्यावर जळलेल्या अवस्थेत कापड चिकटलेले होते. निळ्या रंगाची पँट त्याने धारण केली होती. त्याच्या एका पायाला थोडीशी जखम झाल्याच्या खुणा दिसत होत्या, तर पायात चप्पल वा बूट काहीच नव्हते. हा तरुण अंदाजे वीस ते बावीस वर्षे वयाचा असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, सहायक पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मारुती जगताप, पोलिस निरीक्षक विकास गावडे हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तरुणाच्या अंगावर काही ठिकाणी रक्ताचे डाग दिसत होते. पोलिसांनी तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रत्नागिरीकडे पाठविला आहे. यावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत जाधव, प्रथमेश सावंत, बी. व्ही. जाधव, प्रसाद शिवलकर, साळवी, उपसभापती उमेश पराडकर, सेनेचे उपजिल्हाप्रमुख अशोक सक्रे, रायपाटणचे शाखाप्रमुख मनोज गांगण, मनोहर सप्रे, प्रसाद पळसुलेदेसाई, अमोल शेट्ये, आप्पा साळवी, विकास कोलते, खापणे महाविद्यालयाचे अध्यक्ष मनोहर खापणे आदी उपस्थित होते. जळालेला मृतदेह ओळखणे अवघड असले तरी तो तरुण या परिसरातीलनसावा, अशी चर्चा सुरू आहे. त्या तरुणाची जीभ बाहेर आल्याने कदाचित त्याचा प्रथम गळा आवळण्यात आला असावा व नंतर त्याचा मृतदेह रायपाटणच्या खिंडीत आणून पेटवून देण्यात आला, असा पोलिसांचा अंदाज आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)