शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

बेपत्ता महिलेचा आढळला विहिरीत मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:24 IST

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-खंडाळा येथून दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह घराच्या विहिरीत आढळला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० ...

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-खंडाळा येथून दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह घराच्या विहिरीत आढळला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या दरम्याने उघडकीला आली. रुक्मिणी लक्ष्मण वाळके (३८, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. वाटद-खंडाळा) असे बुडून मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मात्र, तिने आत्महत्या केली की अन्य काही कारण आहे, याचा शाेध पाेलीस घेत आहेत.

याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिचे पती लक्ष्मण हाेनाप्पा वाळके यांनी पाेलीस स्थानकात याविषयीची फिर्याद दिली़. या फिर्यादीनुसार २५ मे रोजी सकाळी ५.३० वाजल्यापासून त्यांची पत्नी घरातून निघून गेली होती. त्यांनी खंडाळा आणि इतर नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, पत्नीचा काेठेही शाेध न लागल्याने त्यांनी जयगड पोलीस स्थानकात बेपत्ता म्हणून फिर्याद दिली हाेती. लक्ष्मण वाळके हे गुरूवारी सायंकाळी घराजवळील विहिरीजवळ गेले असता, त्यांना विहिरीत पत्नीचा मृतदेह दिसला. त्यांनी पाेलिसांना माहिती देताच पाेलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार जाधव करत आहेत.