शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णगड नौका दुर्घटनेतील आणखी दोघांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:37 IST

रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये मंगळवारी पहाटे ‘आयशाबी’ या मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाली होती

ठळक मुद्देया दुर्घटनेतील मृतांची संख्या ४ झाली आहे.मुसळधार पाऊस व तुफानी वाºयात हेलकावे खाणाºया या नौकेला जलसमाधी मिळाल्याने चारही खलाशी बुडाले

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये मंगळवारी पहाटे ‘आयशाबी’ या मच्छीमारी नौकेला जलसमाधी मिळाली होती. त्यातील ४ खलाशी बुडाले होते. त्यातील दोन खलाशांचे मृतदेह मंगळवारीच सापडले होते. उर्वरित दोन खलाशांचे मृतदेह शोधण्यात तटरक्षक दलाची नौका व जयदीप तोडणकर यांच्या नौकेला यश आले. बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अब्बास पठाण व तवक्कल अब्दुलसत्तार बांगी यांचे मृतदेह सापडले. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या ४ झाली आहे.

पाऊस व तुफानी वाºयामुळे ही नौका बुडाली होती. बुडालेल्या चौघांपैकी जैनुद्दिन पठाण आणि हसन पठाण या या दोघांचे मृतदेह मंगळवारी सापडले होते. मात्र अन्य दोघांचे मृतदेह सापडले नव्हते. तटरक्षक दलाची नौका व स्थानिक जयदीप तोडणकर यांच्या नौकेमार्फत या बुडालेल्या खलाशांचा शोध घेतला जात होता. बुधवारी दुपारी त्यातील एक मृतदेह खाडीच्या मुखाशी सापडला तर दुसरा मृतदेह खाडीतून शोधून काढण्यात दोन्ही नौकांना यश आले.

सागरी महामार्गावरील पूर्णगड येथील जैनुद्दिन लतिफ पठाण हा आयशाबी नावाची मासेमारी नौका (एनडी-एमएच-४-एमएम-२९८१) घेऊन सोमवारी जेवण आटोपून दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मासेमारी करण्यासाठी समुद्रात केले होते. जैनुद्दिन पठाण याच्यासोबत त्याचे दोन सख्खे भाऊ अब्बास, हसन आणि आणखी एक सहकारी तव्वकल अब्दुलसत्तार बांगी हेही नौकेवर होते. मात्र मुसळधार पाऊस व तुफानी वाºयात हेलकावे खाणाºया या नौकेला जलसमाधी मिळाल्याने चारही खलाशी बुडाले होते. बुधवारी सापडलेले दोन्ही खलाशांचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयातील शवागारात पाठविण्यात आले. ही माहिती रत्नागिरीचे तहसीलदार मच्छींद्र सुकटे यांनी दिली.