शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मंडल कार्यालयधोक्याच्या जागेत

By admin | Updated: July 17, 2014 23:54 IST

दुर्लक्षाचा कळस : महसूल खात्याला काळजीच नाही

पाचल : दरवर्षी लाखो रुपये महसूल गोळा करणारे पाचल मंडल अधिकारी कार्यालय स्वत:च्या मालकीच्या इमारतीपासून आजपर्यंत वंचित आहे. हे कार्यालय वर्षानुवर्षे मोडकळीस आलेल्या शासकीय गोदामातच सुरू असून, ते बदलण्याच्या मागणीकडे आतापर्यंत दुर्लक्षच झाले आहे.पाचल मंडल अधिकारी कार्यालय पाचल (ता. राजापूर) बाजारपेठेत शासकीय जमिनीत ब्रिटिशकालीन धान्य साठवण गोदामाच्या इमारतीत सुरु आहे. ब्रिटिश सरकार १५ आॅगस्ट १९४७ या मध्यरात्री देशातून पायउतार झाले. त्यांनी त्यांच्या काळात बनवलेल्या इमारती असोत वा पूल. त्यांचे आयुष्यमान लांबलचक असल्याचे कामाच्या दर्जावरून सिद्ध करुन दाखवत आहेत. अशीच एक इमारत पाचल गावात ब्रिटिश काळात धान्य गोडाऊन म्हणून बांधण्यात आली. तिचा वापर आता मंडल अधिकारी कार्यालय करत आहे.पाचल मंडल कार्यालय ज्या इमारतीत सुरु आहे ती इमारत आता धोकादायक झाली आहे. इमारतीला पूर्ण तडे गेले आहेत. इमारत धोकादायक झाल्याने अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना काम करणे जोखमीचे झाले आहे. ब्रिटिश काळापासून आजपर्यंत दरवर्षी लाखो रुपये महसूलच्या नावाने हे कार्यालय शासन दरबारी जमा करत आहे. शासनाची प्रशस्त जागा उपलब्ध आहे, असे असताना मंडल अधिकारी कार्यालयाला स्वमालकीची इमारत उपलब्ध नाही. एका बाजूने महसूल गोळा करताना भिंतीच्या छताखाली काम करणारे कर्मचारी, तर अनेक वेळा भेट देऊनही दुर्लक्ष करणारे वरिष्ठ कार्यालय अशी व्यथा झाल्याने ही जुनी इमारत हा भार कधीपर्यंत सोसणार आहे, असा अनुत्तरीत प्रश्न उभा राहतो. सुमारे ५ गुंठ्यापेक्षा जास्त जागा उपलब्ध असताना त्याचा नियोजनपूर्ण वापर होत नसल्याने मंडल अधिकारी कार्यालय स्वमालकीच्या इमारतीला मुकले आहे. अर्जुना मध्यम प्रकल्प पूर्णत्त्वास जात आहे. जामदा प्रकल्प सुरु होण्याच्या स्थितीत आहे. दोन्ही प्रकल्प याच मंडल कार्यक्षेत्रात येतात. इथले कर्मचारी, अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालय यांची इच्छाशक्ती दांडगी असती तर दोन्ही प्रकल्पात या मंडल कार्यालयाची इमारत पूर्ण झाली असती. परंतु असे घडताना दिसून येत नाही. शेतकऱ्यांना डावलून दलालांमार्फत जमीनमाफियांना १००च्या पटीत ७/१२ दिले जातात. तेसुद्धा सहज सोप्या पद्धतीने. परंतु ज्या धोक्याच्या इमारतीत आपण आपले काम करत आहोत, ती इमारत आपल्यावर कधीही कोसळू शकते, याची कल्पना नसावी, याचे आश्चर्य वाटते. (वार्ताहर)