शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

भरपाईचं लोणी मंडल अधिकाऱ्याने हडपलं

By admin | Updated: April 4, 2015 00:10 IST

राजापुरातील प्रकार : मंडल कृषी अधिकाऱ्याचा प्रताप

राजापूर : येथील तालुका कृषी कार्यालयातील लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण गाजत असतानाच आता राजापूर मंडल कृषी अधिकाऱ्याने सन २०११-१२चे आंबा नुकसान भरपाईचे अनुदान स्वत:च लाटले. हा प्रकार उघड झाल्याने तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे.एकाच सातबारा उताऱ्यावर तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले असून, या संपूर्ण आंबा नुकसान भरपाई अनुदानामध्ये लाखोंचा गोलमाल केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजापूर कृषी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .राजापूर मंडल कृषी अधिकारी पदाचा प्रभारी कार्यभार स्विकारल्यानंतर अनिल कावतकर यांनी आपले वडील रघुनाथ नारायण कावतकर व अन्य तीन यांच्या नावे तालुक्यातील पाथर्डे येथील सर्व्हे नंबर ७१/२ वरील २०० झाडांच्या नुकसान भरपाईपोटी एक वेळ रघुनाथ कावतकर व दोनवेळा आपल्या स्वत:च्या नावे असे एकूण तीनवेळा सुमारे ५४ हजार रुपयांचे अनुदान लाटले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.या नुकसान भरपाईच्या याद्यांवर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सह्या असून तेही यामध्ये सामील असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून उघडपणे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देताना चकरा मारायला लावणारे अधिकारी स्वत:च्या फायद्यासाठी या कारभाराकडे डोळेझाक करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे या आंबा बागायतदारांचे नुकसान होते. त्यांना नुकसानभरपाई मिळावी, म्हणून राज्य शासनाने हेक्टरी नऊ हजार रुपयांप्रमाणे जास्तीत जास्त अठरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कृषी कार्यालयाने सर्वेक्षण करुन लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार केली व संबधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हे अनुदान वर्ग केले. मात्र, असे असताना कावतकर यांनी आपले वडील व अन्य तीन यांच्या नावे असणाऱ्या सर्व्हे नंबर ७१ / २मधील आंबा कलमांची चक्क तीन वेळा रक्कम वेगवेगळ्या तीन बँक खात्यांवर वर्ग करुन घेतली.प्रारंभी कावतकर यांनी त्यांच्या वडिलांची जमीन राजापूर मंडल कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत असताना वडील रघुनाथ नारायण कावतकर यांचे नाव कुंभवडे मंडल कृषी अधिकाऱ्यांच्या यादीत टाकले व दोन हेक्टरचे अठरा हजार रुपये स्टेट बँक आॅफ इंडियाच्या राजापूर शाखेतील खाते नंबर ११३२५८९६१२१ या रघुनाथ कावतकर यांच्या खात्यावर २ सप्टेंबर २0१३ रोजी जमा केले. त्याचा चेक नंबर ७९६३१७ असा होता. त्यानंतर राजापूर मंडल कृषी अधिकाऱ्यांच्या यादीत पुन्हा त्याच ७/१२ साठी आपल्या वडीलांऐवजी आपल्या स्वत:च्या म्हणजेच अनिल रघुनाथ कावतकर यांच्या नावे सारस्वत बँकेच्या राजापूर शाखेत दिनांक ०३ मार्च २०१४ रोजी चेक नंबर १२०९०३ ने खाते नंबर ३४७२०३१००००१७८० वर पुन्हा दोन हेक्टरचे अठरा हजार रुपये अनुदान वर्ग केले .केवळ ऐवढ्या रकमेवरच पोट भरले नाही म्हणून की काय पुन्हा कावतकर यांनी सन २०११ - २०१२ याच आर्थिक वर्षासाठी आंबा नुकसान भरपाईचे अनुदान तिसऱ्यांदा त्याच सर्व्हे नंबर ७१ / २ वरील आंबा कलमांसाठी आपल्याच नावे स्टेट बँक शाखा, राजापूरमधील खाते नंबर ३३३२४२४३०६७ वर दोन हेक्टरसाठी अठरा हजार रुपयांचे अनुदान वर्ग करुन घेतले आहे. या सर्व्हे नंबर ७१ / २ वरील दोनशे आंबा कलमांसाठी अनिल कावतकर यानी दोन वेळा आपल्या नावे रक्कम जमा करुन घेतली आहे. त्या सातबारा उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंदच नसल्याची माहितीही उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)धक्कादायक प्रकाररत्नागिरी जिल्ह्यात अनेकवेळा नुकसानभरपाई घेण्यास शेतकरी पुढे येत नाहीत. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी न केलेल्या जागृतीचाही हात असतोच. त्यामुळे ही शेतकऱ्यांच्या नशिबातलं भरपाईचं लोणी सरळसरळ अधिकारीवर्गच हडप करत असल्याचा आरोप राजापुरात होत होता. आता ‘लोकमत’ने शोधून काढलेल्या या प्रकरणामुळे हे सत्य पुढे आले आहे.एकाच सातबारा उताऱ्यावर वेगवेगळ्या बँक खात्यावर तब्बल तीन वेळा अनुदान वर्ग.राजापूर कृषी कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात तीव्र संताप.सातबारा उताऱ्यावर नावाची नोंदच नसल्याची माहिती उघड.दोनशे आंबा कलमांसाठी दोनदा भरपाई आपल्या नावावर जमा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार.