जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर व रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात चाफे महाविद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील ३५ दात्यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रक्तदान केले.
जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांनी केलेल्या आवाहनानुसार चाफे मयेकर महाविद्यालयाने या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील उर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, सचिव रोहित मयेकर, कोषाध्यक्ष ऋषिकेश मयेकर, संचालक सुरेंद्र माचिवले, चाफे गावातील सरपंच गोवळकर, प्राचार्य स्नेहा पालये, उपप्राचार्य गणेश कुळकर्णी यांसह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिरामध्ये ३५ व्यक्तींनी रक्तदान केले. यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व परिसरातील ग्रामस्थ इ सामावेश होता. या सर्वांचे संस्थाध्यक्ष मयेकर, रोहित मयेकर, प्राचार्या स्नेहा पालये यांनी आभार मानले.