शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आकेशियाच्या तोडीला खुलेआम आशीर्वाद

By admin | Updated: July 16, 2014 23:05 IST

मंडणगड तालुका : झाडी तोडण्याच्या नावाखाली वृक्षतोड

मंडणगड : वन विभागाच्या आशीर्वादाने तालुक्यातील काही लाकूडमाफियांनी बांधकाम विभागाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करुन रस्त्याशेजारील आकेशिया झाडांची खुलेआम कत्तल सुरू ठेवली आहे. काही वर्षांपूर्वी शासनाने रस्त्याशेजारी आकेशियाची झाडे उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. आता ही झाडे मोठी झाली असून, या झाडांची खुलेआम कत्तल करण्यात येत आहे. बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेली आकेशियाची सर्व झाडे तोडण्याचे सत्र गेल्या आठवड्यात सुरु झाले असून, यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही प्रमुख रस्त्यांशेजारी सुरू असलेली वृक्षतोड अद्याप थांबलेली नाही. सावरी घोसाळे पट्ट्यातील गावांमधून आकेशियाची तोड करुन गाड्या भरुन जात असल्याची तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत़ यासंदर्भात बांधकाम विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, झाड तोडण्यासाठी कुठलाही अधिकृत लिलाव केलेला नाही. मात्र, वाहतुकीस अडचण करणारी वाकलेली झाडे तोडण्याची सूचना येथील अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारात दिल्याची माहिती मिळाली आहे. कायदा व प्रक्रियेला बगल देऊन बांधकाम विभागाने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असली तरी वृक्षतोड करताना बांधकाम विभागाचे अधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी जागेवर उपस्थितच न राहिल्याने वाहतुकीस अडथळा असलेली झाडे वगळता इतर सर्व झाडे तोडून साफ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वृक्षतोडीसाठी पुढे असलेल्या लाकूडमाफियांना येथील वनखात्याच्या प्रमुखाचा पाठिंबा असल्याचेही स्पष्ट होत आहे. बांधकाम विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने असे प्रकार घडत असल्याचे येथील अभियंत्यांचे मत आहे. दुसरीकडे कोणत्याही प्रक्रियेशिवाय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्षतोडीचे आदेश निर्गमित केलेच कसे? हा प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे. (प्रतिनिधी)