शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भाजप बनले अवघड जागेचे दुखणे

By admin | Updated: October 23, 2014 22:49 IST

युती तुटली अन्... : पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील स्थिती

रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद आणि रत्नागिरी पंचायत समितीचे उपसभापतीपदी भाजपकडे असल्याने आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर युती तुटल्याने आता अडीच वर्षासाठी ही दोन्ही पदे भाजपकडेच राहण्याची चिन्ह आहेत़ पुरेसे संख्याबळ नसतानाही भाजपचे सदस्य या दोन्ही पदांवर राहणार आहेत़जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेना - भाजपची मागील २५ वर्षांपासूनची युती आहे़ विधानसभेच्या निवडणुकीत युती तुटल्याने त्याचे परिणाम जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील युतीवर होईल, असे वाटत होते़ मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष व विषय समित्यांच्या निवडणुकीमध्येही भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेबरोबर राहण्याची भूमिका प्रामाणिकपणे निभावली़ विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष उदयास आल्याने शिवसेनेला बरोबर घेण्यावरुन अजूनही एकमत झालेले नाही़ वेळ पडल्यास शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्याची भूमिका जाहीर केली होती़ त्यामुळे आता नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील युती राहणार की, तुटणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ राज्यस्तरावर युती तुटली असली तरी जिल्हा व तालुकास्तरावर शिवसेनेची ताकद जास्त असल्याने भाजपला कोंडीत पकडणे सोपे नाही़ त्यामुळे आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये भाजप हे शिवसेनेचे अवघड जागेचे दुखणे ठरणार आहे़ कारण रत्नागिरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ असले तरी महत्त्वाचे उपसभापती आणि उपाध्यक्ष ही पदे भाजपकडे राहणार आहेत़ कारण जिल्हा परिषदेत शिवसेनेचे २६ सदस्य असले तरी अविश्वास ठरावही आणू शकत नाहीत़ तसेच उपाध्यक्ष सतीश शेवडे पुढील अडीच वर्षांपर्यंत राजीनामा देणार नाहीत, निश्चित आहे़ पुढील अडीच वर्षे शिवसेनेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद व रत्नागिरी पंचायत समितीतील उपसभापतीपदावर संख्याबळ असतानाही आपल्या सदस्याची निवड करता येणार नाही़ (शहर वार्ताहर)