शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, काँग्रेससह राष्ट्रवादी एकत्र ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:46 IST

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : सेनेला शह देण्याचे डावपेचतालुक्यातील जनता सेनेबरोबर आहे,संघटनात्मक बांधणीत त्यांचे चांगलेच वजन

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार असून, त्यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तालुक्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी या गडावर स्वारी करण्याचे डावपेच विरोधकांनी आखले आहेत. त्यासाठी सेनेविरोधात भाजप, राष्टÑवादी कॉँग्रेस व कॉँगे्रस एकत्र येणार असल्याची चर्चा जोरात आहे. तशा हालचालीही सुरू झाल्याने शिवसेनेनेही आपला गड शाबूत राखण्यासाठी कंबर कसल्याचे राजकीय चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सेना आपला गड राखणार की, विरोधकांच्या डावपेचात सेनेच्या गडाची तटबंदी कोसळणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यात शिवसेना भक्कम आहे. संघटनात्मक पातळीवर सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचे हे यश मानले जाते. त्यांनी गावागावात शिवसेनेची चांगली बांधणी व्हावी, यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. त्यामुळे तालुक्यात संघटनात्मक बांधणीत त्यांचे चांगलेच वजन आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण निवडणूक तसेच याआधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही सेनेने सर्वाधिक यश मिळवले आहे.

२९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या १४ आॅक्टोबरला होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मात्र, आता तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांना सेनेतच अनेक स्पर्धक निर्माण झाले आहेत. त्यांच्याकडे असलेल्या तालुकाप्रमुखपदावर काहीजणांचा डोळा आहे. यावेळच्या निवडणुकीत विरोधकांशी हातमिळवणी करून साळवी यांना नामोहरम करण्याचे राजकारणही संघटनेत खेळले जात असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची लढाई जिंकणे हे बंड्या साळवी यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.बंड्या साळवी : शिवसेनेचेच वर्चस्वरत्नागिरी तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या आॅक्टोबर महिन्यात.शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी या गडावर स्वारी करण्याचे डावपेच.शिवसेनेनेही आपला गड शाबूत राखण्यासाठी कंबर कसली.साळवींच्या तालुकाप्रमुखपदावर काहीजणांचा डोळा?विरोधकांनी २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सेनेविरोधात कितीही ताकद उभी केली तरी या सर्व ग्रामपंचायतींवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असा विश्वास सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांंकडे व्यक्त केला. शिवसेनेचे तालुक्यावरील वर्चस्व कमी करण्यासाठी विरोधक डावपेच आखत आहेत. मात्र, त्यात त्यांना यश येणार नाही. तालुक्यातील जनता सेनेबरोबर आहे, असेही साळवी म्हणाले.