शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘बायोगॅस’चे यंदा १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

By admin | Updated: May 1, 2016 00:14 IST

पी. एन. देशमुख : जिल्ह््यात २७० प्रकल्पांची उभारणी

रत्नागिरी : राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत मागील आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बायोगॅसचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, जिल्ह्यात २७० बायोगॅस उभारण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. चुलीला पर्याय म्हणून ग्रामीण भागात बायोगॅस उभारण्यात जिल्हा परिषद कृषी विभागाला काही प्रमाणात का होईना यश आले आहे. चुलींमुळे जंगलांचा ऱ्हास होतो. तसेच कंपन्यांकडून मिळणारा गॅस खरेदी करण्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे बायोगॅस हा परवडणारा व प्रदूषणमुक्त असल्याने तो फायद्याचा ठरत आहे. त्यासाठी शासनाकडून बायोगॅस प्रकल्प उभारण्यास आर्थिक सहाय्यही करण्यात येते. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला बायोगॅस प्रकल्प देण्यात येतो़ बायोगॅसच्या एक घन फुटासाठी ५ हजार रुपये तर २ ते ५ घनफुटासाठी ९ हजार रुपये देण्यात येतात़ त्याला जर शौचालय जोडायचे असल्यास आणखी १२०० रुपये अधिक देण्यात येतात. त्यासाठी संबंधित शेतकऱ्याकडे जनावर असणे आवश्यक आहे़ जिल्ह्यासाठी २७० बायोगॅस प्रकल्पांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी आत्तापर्यंत बायोगॅसच्या मागणीप्रमाणे कामे करण्यात आली असून, २७० बायोगॅस प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली होती. मागेल त्याला बायोगॅस अशी योजना राबविण्यात आली होती. मात्र, या योजनेबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये उदासिनता दिसून येत होती. अखेर जिल्हा परिषद कृषी विभागाच्या प्रयत्नाला यश येऊन बायोगॅसचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)कृषी विभाग : दुरुस्तीसाठी मदत मिळत नसल्याची खंत२०१४-१५ या आर्थिक वर्षांमध्ये जिल्ह्याला २५० बायोगॅस आणि २०१५-१६ मध्ये २७० बायोगॅस प्रकल्पांचे उद्दिष्ट जिल्हा परिषद कृषी विभागाला देण्यात आले होते. हे उद्दिष्ट दोन्ही वर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र, एखाद्या वेळी बायोगॅसच्या दुरुस्तीचे काम निघाल्यास त्यासाठी लागणारा खर्च लाभार्थ्यानेच करावयाचा असतो. दुरुस्तीसाठी शासनाकडून कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे बायोगॅसबाबत लोकांमध्ये नाराजी आहे. मात्र तरीही यंदा कृषी विभागाने आपले उद्दीष्ट पूर्ण केले आहे.बायोगॅस वापर वाढलाचुलीला पर्याय म्हणून ग्रामीण भागात बायोगॅसचा प्रसार सुरु आहे. ग्रामीण भागात साऱ्यांनाच सिलिंडरचा पर्याय परवडत नाही. त्यांच्यासाठी बायोगॅस हा पर्याय आहे. त्यामुळे बायोगॅसचा वापर वाढू लागला आहे.