शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता समित्या केवळ कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 23:36 IST

रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच ...

रत्नागिरी : जैवविविधतेचे संवर्धन, जोपासना आणि पोषण करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच जैवविविधता नोंदवह्याही तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, या समित्यांचे कामच सुरू झालेले नसल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून देण्यात आली आहे.या समित्यांना ३० डिसेंबरपर्यंत नोंदवह्यांचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. मात्र, स्थानिक पातळीवर त्याचे संवर्धन, जोपासना आणि पोषण होत नाही. ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षतेमुळे जैवविविधतेचा मोठा भाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाने जैवविविधता टिकविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ही समिती स्थापन करण्याबाबत सन २०१५मध्ये आदेश दिले होते. या आदेशानुसार जैवविविधतेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या समित्या स्थापन करण्यास मदतीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी चार संस्थांची निवड केली होती. समित्या स्थापनेनंतर ३३ प्रकारच्या अर्जांमध्ये त्या-त्या ग्रामपचांयतींच्या हद्दीतील माहिती भरवून घेण्यात आली होती. मात्र, या समित्या केवळ कागदावरच राहिल्या असून, गेली चार वर्षे समित्या अकार्यरत राहिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे समित्यांना मुदत दिली आहे. या नोंदवह्या मुदतीत पूर्ण न झाल्यास ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत.समित्यांची कामेजैवविविधता जोपासणे, टिकविणे, त्याचे पोषण करणे तसेच जैवविविधतेच्या पारंपरिक आणि आधुनिक माहितीचे संकलन करून त्याचा उपयोग समाजासाठी करून देणे गरजेचे आहे. परिसरातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांना जैवविविधतेचा वारसा स्थान म्हणून जाहीर करून त्यांचे संरक्षण व विकास करणे, धोक्यात आलेल्या प्रजातींचे संरक्षण आणि पुनर्वसन करणे अशी कामे या समित्या करणार आहेत. जिल्ह्यातील वनऔषधी, वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक, पाळीव प्राणी, दुर्मीळ वन्यजीव आणि वनस्पतींचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.