शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

सायकलची हवा काढली

By admin | Updated: August 31, 2015 21:14 IST

जिल्हाधिकारी : जिल्हा परिषदेची घनकचरा गोळा करण्याची योजना ‘कुंडी’त

रहिम दलाल --- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५६ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा गोळा करण्यासाठी जिल्हा परिषदेने तीनचाकी सायकल खरेदीसाठी पाठवलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून नाकारण्यात आला. जिल्ह्यातील एकाही नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात वा ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा प्रकल्प नसल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषद हद्दीमधील कचरा शहरातच टाकण्यात येतो. मात्र, त्याचे विघटन होत नसल्याने कचरा टाकण्यात येत असलेले परिसरातील रहिवासी प्रदूषणाने त्रस्त झाल्याचे चित्र सध्या सर्वच शहरांमध्ये दिसत आहे. जिल्ह्यात कितीही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असली तरी घनकचऱ्याचा प्रश्न जैसे थे आहे. शहरात कचराकुंड्यांमध्ये कचरा टाकण्यात येत असला तरी तो दररोज उचलणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने तो अस्ताव्यस्त पसरलेला असतो. तसेच रत्नागिरी शहरात घंटागाडीची सोय आहे. मात्र, सुटीच्या दिवशी कचरा विल्हेवाटीची सोय नसल्याने कचराकुंड्या भरलेल्या असतात.तसेच लोकसंख्या जास्त असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने बहुतांश वेळा कचराकुंड्यांमध्येच कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेकडून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात ४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा गोळा करण्यासाठी तीन चाकी सायकल ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य टिकून राहण्यास मदत होणार होती. म्हणून तीन चाकी सायकलसाठी प्रत्येकी २५ हजार ५०० रुपये खर्च करण्यात येणार होते. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ५६ ग्रामपंचायतींना अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी १४ लाख २८ हजार रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून हा प्रस्ताव नाकारण्यात आला. ग्रामपंचायतींना तीन चाकी सायकल देण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न केले होते. या ग्रामपंचायतींना आता अन्य कोणत्या योजनेतून तीन सायकल दिली जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)रत्नागिरी शहरा लगतची शिरगांव ग्रामपंचायत जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी मानली जाते. या ग्रामपंचायतीने घरोघरी जाऊन कचरा संकलीत करण्यासाठी घंटागाडीची सोय केली आहे. ही घंटागाडी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक भागात जाऊन घनकचरा गोळा करते. घंटागाडीची सोय४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या-तालुका ग्रामपंचायतीदापोली ६खेड ३चिपळूण ६गुहागर ८संगमेश्वर ५रत्नागिरी१९राजापूर ९एकूण ५६