शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

दोणवली आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत दोणवली येथे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती. ...

चिपळूण : तालुक्यातील कापरे प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत दोणवली येथे उपकेंद्र व्हावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थांमधून केली जात होती. अखेर त्याला यश आले आहे. उपकेंद्रासाठी आवश्यक जागा उपलब्ध झाल्याने निधी मंजूर झाला आणि या उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष व दोणवलीचे माजी सरपंच डॉ. मधुकर चांदिवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

दोणवली येथील ग्रामस्थ व महिलांना आरोग्यविषयक सेवा सुविधांसाठी कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते. त्यामुळे गावातच उपकेंद्र होण्याची मागणी अनेक वर्षे केली जात होती. मात्र, त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नव्हती. सरपंच डॉ. मंदार चांदिवडे यांनी बिनविरोध सरपंच म्हणून सुत्रे स्वीकारल्यानंतर रखडलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केले. गावात आवश्यक ठिकाणी सरंक्षक भिंती, वाडीवस्तीवर पाखाड्या, अंतर्गत रस्ते मार्गी लावले. उपकेंद्रासाठी मोफत जागा मिळण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांशी नियमित संवाद ठेवला. यातून प्रमोदिनी गुरव व प्रेमिला मारूती गुरव या दोन्ही सख्ख्या बहिणींनी रस्त्यालगत असलेली ५ गुंठे जागा उपकेंद्रासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली.

भूमिपूजनप्रसंगी या दोन्ही भगिनींचे ग्रामपंचायतीच्यावतीने आभार मानण्यात आले. कार्यक्रमाला माजी सरपंच सुशिला पवार, जाफर कवारे, संताजी कदम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष कदम, उपसरपंच हेमंत परचुरे, सदस्य गणेश लाड, अश्‍विनी भुवड, जरिना डबीर, मानसी पवार, सोसायटी चेअरमन अशोक चव्हाण, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अप्पा चव्हाण, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.