शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर भोई समाजाचे उपोषण

By admin | Updated: December 12, 2015 00:13 IST

लोटे औद्योगिक वसाहत : दाभोळ खाडीत रासायनिक पाण्यामुळे मासे मरण्याच्या घटनांमध्ये वाढ; उपोषणात महिलांचा सहभाग

चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत मासे मरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. खाडीतील प्रदूषणाविरोधात शुक्रवारी दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीतर्फे चिपळूण येथील प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाबाहेर उपोषण करण्यात आले. यावेळी दाभोळ खाडी परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ, सल्लागार विठ्ठल भालेकर, आर. आर. जाधव, शांताराम जाधव, विनायक निवाते, महाराष्ट्र प्रदेश भोई समाजसेवा संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष रामदास पडवळ, संतोष पडवळ, प्रकाश पारधी, उदय जुवळे, कृष्णा पडवळ, दिलीप दिवेकर, केशव सैतवडेकर आदींसह महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दाभोळ खाडीमध्ये लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मरण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे दाभोळ खाडीतील मच्छिमार भोई समाजाचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय पूर्णत: बंद झाला आहे. या खाडीतील माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. गेली १७ वर्ष संघर्ष समितीतर्फे विविध आंदोलने करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, अद्यापही या खाडीतील प्रदूषणावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. लोटे येथील सामुदायिक जलशुध्दीकरण प्रकल्पाचे नूतनीकरण व विस्तारीकरणाचे काम तातडीने सुरु करावे. रासायनिक सांडपाणी दाभोळ खाडीत न सोडता रिसायकलिंग करुन परिसरातील झाडांसाठी वापरण्यात यावे. तसेच चिपळूण, खेड, दापोली, गुहागर या तालुक्यातील मच्छिमारांच्या गेल्या ५ वर्षातील मच्छि उत्पादनाचे सर्वेक्षण करुन बाधित कुटुंबांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. मच्छिमार भोई समाजातील कुशल व अकुशल मुलांना लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे. दाभोळ खाडीपट्टयातील गावांना प्रकल्पग्रस्त संबोधून सीएसआरखाली मच्छिमारांचे पुनर्वसन करण्यात यावे. या मागण्यांचा गांभिर्याने विचार व्हावा, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली आहे. दि. १४ डिसेंबर रोजी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात प्रदूषणासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिले असून, दाभोळ खाडी प्रदूषणमुक्त होण्यासाठी हा लढा सुरुच राहिल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. (वार्ताहर) २६ कोटी मंजूरलोटे औद्योगिक वसाहतीच्या दूषित पाणी शुध्दीकरणासाठी राज्य व केंद्र सरकारने २६ कोटी रुपये मंजूर केले असून, जलशुध्दीकरण केंद्राचे काम सुरु करण्याचे आश्वासन देऊनही हे काम वर्ष झाले तरी सुरु करण्यात आले नाही. विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी शासनाने वेळ न दिल्यास जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशाराही विठ्ठल भालेकर यांनी दिला आहे.