शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई!
2
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
3
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
4
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
5
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
6
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
7
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
8
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
9
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
10
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
11
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
12
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
13
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
14
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
15
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
16
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
17
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
18
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
19
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
20
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र

घंटा वाजली, शाळा भरली, आईची काळजी अजूनच वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने एका महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोना रुग्ण नसलेल्या गावातून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने एका महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोना रुग्ण नसलेल्या गावातून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील ४६५ शाळांपैकी पाच शाळांचे अध्यापन प्रत्यक्ष सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी अशा स्थितीत मूल शाळेत जाणार म्हणून प्रत्येकाची आई मात्र काळजीतच आहे.

प्रत्यक्ष वर्ग सुरू करताना, सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून बैठकीत शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव संमत करण्याची सूचना केली हाेती. त्यानुसार पाच गावांतून ठराव संमत करण्यात येऊन शाळा सुरू करण्याबाबत पालकांचीही संमत्ती घेण्यात आली. जिल्ह्यातील ८४९ गावे काेरोनामुक्त झाली असताना अवघ्या पाच गावांमधील पालकांनीच शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. मात्र सर्वत्र सुरू असलेले लसीकरण, आरोग्य यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. विद्यार्थीही घरी राहून कंटाळले असून ऑनलाइन अध्यापनात भेडसावणाऱ्या समस्यांमुळे मुलेही शाळेत जाण्यासाठी उत्सुक झाली आहेत. सध्या सुरू करण्यात आलेल्या पाच शाळांमध्ये २५० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली असून टप्प्याटप्प्यांनी उपस्थिती वाढण्याची शक्यता आहे. पालकांची संमती मिळाल्यानेच वर्ग सुरू झाले आहेत.

काळजी आहेच, पण शिक्षणही महत्त्वाचे!

माझी मुलगी बारावीला आहे. कोरोनामुळे ऑनलाइन अध्यापन सुरू झाले होते, मात्र बऱ्याच वेळा नेटवर्कमुळे समस्या निर्माण होत असत. शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर गावात बैठक घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी शाळेत पाठवत आहे.

- मानसी मंगेश डिके, पालक, तुरळ

गेले दीड वर्ष शाळा प्रत्यक्ष बंद असल्या तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापन करण्यात येत आहे. परंतु शाळा सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली, त्यावेळी आमचीही शाळा सुरू करण्यात आली आहे. मुलांच्या आरोग्य सुरक्षेची काळजी वाटते, परंतु शाळेकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

- सदिच्छा पाचकले, पालक, तुरळ

कोरोना महामारीत ऑनलाइन अध्यापन स्तुत्य उपक्रम होता. मात्र शाळेतील अध्यापन व ऑनलाइन अध्यापनात कमालीचा फरक आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असणे व वेळेची मर्यादा या दोन्ही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. कोरोनामुळे मुलांच्या आरोग्य सुरक्षेबाबत काळजी वाटते. परंतु ग्रामपंचायत, शाळा विशेष दक्षता घेत असल्याने मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटत नाही.

- शर्मिला येलाेंडे, पालक, तुरळ

शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघाेळही करा!

चार तास सलग वर्ग भरविण्यात येत आहेत. शाळेतून सुटल्यानंतर मुलांना घरी आल्यानंतर थेट आंघोळीला पळावे लागते. खबरदारी म्हणून गणवेष दररोज धुऊन घातला जात आहे. शाळेत येताच मुलांची ऑक्सिजन मात्रा, तापमान तपासले जात आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात आहे. मास्क लावणे तर सक्तीचा असून पालक मुलांना जादा मास्क दप्तरातून देत आहेत. वर्ग सुटल्यानंतर मुले थेट घरी जात आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात आहे. शिक्षकही येता-जाता मुलांवर लक्ष ठेवून आहेत.