दापाेली : तालुक्यातील दाभोळ ते केळशी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ऑईलचा तवंग आला आहे. हा तवंग कंपन्यांच्या बॅरलमधील असल्याचे समाेर आले आहे. या तवंगामुळे जलचरांच्या अस्तित्वाला धाेका निर्माण झाला असून, समुद्रकिनारा प्रदूषित झाला आहे.
दापोली तालुक्यातील आडे, पाडले, केळशी, आंजर्ले या किनारपट्टीवर तेलाचे तवंग आल्याने संपूर्ण किनारपट्टी काळवंडली आहे. यातच केमिकल व तेलाचे कित्येक बॅरल समुद्रकिनारी आले आहेत हे बॅरल फुटून आतील केमिकल व तेल सर्वत्र समुद्रकिनारी पसरले आहे. या केमिकल व तेलाच्या तवंगामुळे संपूर्ण किनारपट्टी प्रदूषित झाली आहे. या केमिकल व तेलामुळे काही जलचरांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे परिसरातील मच्छीमार बांधवही आता धास्तावला आहे. या प्रकारामुळे निसर्गप्रेमी, स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार बांधव आक्रमक झाले आहेत. समुद्रकिनारी ज्या कंपन्यांचे बॅरल सापडले आहेत. या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी रत्नागिरीसह रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.