शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

वेळासमध्ये पट्टेरी वाघाचे कातडे जप्त

By admin | Updated: July 16, 2016 23:33 IST

एकास कोठडी : धागेदोरे हाती लागण्याची शक्यता

देव्हारे : कासवांचे गाव असा नावलौकिक मिळविलेल्या वेळास (ता. मंडणगड) गावामध्ये वाघाचे कातडे मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शैलजा शशिकांत सातनाईक (रा. नारायण नगर, वेळास, सध्या मुंबई) यांच्या घरी हे कातडे सापडले असून, त्यांच्या घराची देखभाल करणाऱ्या दत्तात्रय सुडकोजी भुवड (नारायण नगर) याला वन खात्याने अटक केली आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणात अनेक धागेदोरे हाती मिळण्याची अपेक्षा वन खात्याकडून व्यक्त केली जात आहे.सातनाईक यांच्या घरी वाघाचे कातडे असल्याची गुप्त माहिती चिपळूण वन विभागाला शुक्रवारी (दि. १५) सायंकाळी मिळाली होती. यावरून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सातनाईक यांच्या घराची पाहणी केली. मात्र, घर बंद होते. या घरातील सर्वजण मुंबईत राहत असल्याची माहिती वन अधिकारी विकास जगताप यांना चौकशीदरम्यान मिळाली. या घराची देखरेख करणारा दत्तात्रय भुवड याच्याकडे घराची चावी असल्याचेही त्यांना समजले.शनिवारी सकाळी वन अधिकारी जगताप व त्यांचे कर्मचारी यांनी वेळास गावचे पोलिस पाटील, सरपंच तसेच दोन पंचांसमक्ष या घराचे कुलूप उघडून घराची पाहणी केली. त्यावेळी घरातील एका खोलीमधे पंख्याच्या खाली चटईवर वाघाचे कातडे सुकत ठेवले असल्याचे त्यांना आढळले. या कातड्याबाबत दत्तात्रय भुवड याच्याकडे चौकशी केली असता, या घराच्या मालक शैलजा सातनाईक या वीस दिवसांपूर्वी गावी आल्या होत्या व त्यांनी हे कातडे आणले असल्याचे त्याने सांगितले.पंचनामा करून वन अधिकाऱ्यांनी हे कातडे ताब्यात घेतले. दत्तात्रय भुवड हा एक वर्षापासून या घराच्या व बागेच्या देखरेखीचे काम करीत आहे. वीस दिवसांपूर्वी वाघाचे कातडे घरामधे ठेवून त्याची देखभाल भुवड याने केली. मात्र, या घटनेची माहिती त्याने वन विभाग किंवा पोलिसांना दिली नाही. त्यामुळे वन विभागाने भुवड याला अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी दापोलीचे वनपाल एम. जांभळे, वनरक्षक ओ. व्ही. भागवत, अमित निमकर, अनिल दळवी, एम. जी. पाटील, तौफिक मुल्ला व अशोक ढाकणे उपस्थित होते. चिपळूणचे विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे वनक्षेत्रपाल एस. जी. पाटील व चिपळूणचे वन क्षेत्रपाल जी. एन. कोले अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)