शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी ‘बुरे दिन’

By admin | Updated: June 17, 2015 00:40 IST

संजय कदम : जिल्हा परिषद भेटीप्रसंगी पत्रकारांशी संवाद

रत्नागिरी : आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांना भातबियाण्यासाठी ७५ टक्के सबसिडी देण्यात येत होती. मात्र, आताच्या शिवसेना-भाजप युती शासनाकडून भातबियाण्यांसाठी शेतकऱ्यांना दमडीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसाठी बुरे दिन सुरू झाले असल्याचे दापोली - मंडणगड - खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय कदम यांनी सांगितले. आमदार कदम यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युती शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. युती शासनाच्या कालावधीत जनतेची गळचेपी होत असून, महागाईचा आगडोंब उडाला आहे. तसेच शेतकरीही देशोधडीला लागरे, असा आरोप करुन ते पुढे म्हणाले, पहिल्यांदाच शेतकऱ्यांवर स्वत:चे जुने बियाणे करुन शेती करण्याची वेळ आली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाने शेतकऱ्यांना भात बियाण्यासाठी एक रुपयाही सबसिडी दिलेला नाही. पूर्वीचे शासन शेतकऱ्यांना खरीप हंगामात ७५ टक्के अनुदानावर भात बियाणं देत होते. मात्र, यंदा शासनाने शेतकऱ्यांची निराशा केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात आंबा महोत्सवावर खर्च करण्यापेक्षा ते पैसे भात बियाण्यावर खर्च करुन शेतकऱ्यांना दिले असते तर गरीब शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. मात्र, नटनट्या नाचवून जनतेला काय फायदा झाला, असा प्रश्नही आमदार कदम यांनी उपस्थित केला. जिल्हा परिषद किंवा जिल्हा नियोजन मंडळातून नियोजन करुन भातबियाण्यासाठी तरतूद करुन ते देणे आवश्यक होते, मात्र, तेही केलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, आयटीआयमधील मागासवर्गीयांसाठी असणारे १८० रुपये शुल्क रद्द करुन ते २८०० रुपयांपेक्षा जास्त केले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक फीचा भुर्दंड भरावा लागत आहे. हे शासन नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करुन कोकणातील बागायतदारांसाठी आंबा नुकसान भरपाई ६० कोटी देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोपही कदम यांनी केली. (शहर वार्ताहर)सरकारच्या धोरणांचा निषेध शासनाच्या विरूध्द आमदार संजय कदम यांनी तोफ डागली. विविध प्रश्नांवर सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर कोकणातील शेतकऱ्यांना सरकार न्याय देऊ शकले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. आघाडी सरकारने बियाण्यासाठी शेतकऱ्यांना ७५ टक्के सबसिडी दिली. आताच्या सरकारने दमडीही दिली नाही. या सरकारकडून कोणती अपेक्षा करायची, असा संतप्त सवाल त्यांनी केला.