शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नावर पडणार अक्षता

By admin | Updated: August 24, 2014 00:38 IST

राष्ट्रीय महामार्ग : चौपदरीकरणाचे आज भूमीपूजन

रत्नागिरी : गेली अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचा श्रीगणेशा उद्या रविवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता वांद्री सप्तलिंगी (ता. संगमेश्वर) पुलाच्या भूमीपूजन कार्यक्रमाने होणार आहे. महामार्ग चौपदीकरणाचा हा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला होता.महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त भूसंपादन करणे आवश्यक असल्याने प्रथम या महामार्गावरील पुलांचे विस्तारीकरण होणार आहे. या कामात भूसंपादनाची अडचण होणार नसल्याने विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त होत आहे. या महामार्गावर १४ पूल असून त्याचबरोबर दोन रेल्वे पुलांचा समावेश आहे. या चौपदरीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा बाजारपेठ तसेच राजापूरची लोकवस्ती अडचणीत येण्याची भीती असल्याने तेथून या विस्तारीकरणाला विरोध होत आहे. रविवारी वांद्री सप्तलिंगी पुलाच्या कामाचे भूमीपूजन झाल्यानंतर पूल विस्तारीकरणाचे काम सुरू होईल. इंदापूर ते झाराप असा ३६६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव असून यासाठी १८० कोटी६९ लाख रूपयांचे १२ पूल आणि २ रेल्वे उद्दाणपूल होणार आहेत. अरूंद पूल असलेल्या ठिकाणी नव्याने रूंद पूल बांधण्यात येणार आहेत.या राष्ट्रीय महामार्गावर वाशिष्ठी, सप्तलिंगी, जगबुडी, कोळंबे, आंजणारी, वाकेड, राजापूर, खारेपाटण, जानवली, कसाल, बांबर्डे यासह एकूण १२ पूल व खेड आणि चिपळूण येथे दोन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. महामार्ग भूसंपादनाला मोठा कालावधी लागणार असल्याने चौपदरीकरणाचे काम विलंबाने होण्याची शक्यता आहे. मात्र, चौपदरीकरणाबरोबर पुलाचाही प्रश्न गंभीर असल्याने पूल विस्तारीकरण झाल्यास महामार्गावरील अपघाताचे प्रमाण काहीअंशी कमी होणार आहे.पुलांची कामे जलद गतीने होणार असून त्यासाठी प्रातिनिधक स्वरूपात पुलाच्या ठिकाणी उद्या रविवार, दि. २४ रोजी सायंकाळी ४ वाजता भूमिपूजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)गडकरींची उपस्थिती..महामार्गावरील पुलांचे विस्तारीकरण प्राधान्याने होणार.महामार्गावर १४ पूल, दोन रेल्वे पुलांचाही समावेश.वांद्री सप्तलिंगी पुलाच्या कामाचे भूमीपूजन झाल्यानंतर पूल विस्तारीकरणाचे काम होणार सुरू.इंदापूर ते झाराप असा ३६६ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव.शक्तीप्रदर्शनाची शक्यताचौपदरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षे रेंगाळत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या वाढत्या प्रमाणाने महामार्ग धोकादायक बनला होता. चौपदरीकरणाचा प्रश्न हाताळताना भाजपतर्फे रविवारी शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यावेळी अवजड वाहतूक मंत्री अनंत गीते, विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार विनायक राऊत हेही उपस्थित रहाणार आहेत.