शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोकम योग्य दराच्या प्रतीक्षेत!

By admin | Updated: June 27, 2016 00:40 IST

व्यावसायिकांत नाराजी : कठोर परिश्रमानंतर आमसुलांना आजही बाजारपेठ नाही

बाळकृष्ण सातार्डेकर -- रेडी परिसरात उन्हाळी हंगामाचा शेवट करणाऱ्या कोकम (रातांबा) पिकाला मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. घरोघरी लोक कोकमापासून आमसुले (सोले) बनवतात. कठोर परिश्रम घेऊन तयार करण्यात आलेल्या या आमसुले पिकाला बाजारपेठ अथवा हवा तसा बाजारभाव मिळत नसल्याने उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.रातांबा झाडावरून केवळ पडून फुकट जाऊ नये, म्हणून लोक हा व्यवसाय करीत आहेत. कोकणपट्टीतील आंबा व काजूप्रमाणे कोकमासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे, अन्यथा लोकांमध्ये असलेली अनास्था वाढत जाऊन काळानुरूप हा व्यवसाय बंद होऊ शकतो. उन्हाळी हंगामात काजू, आंबा व कोकम ही तीन महत्त्वाची फळे कोकणातील, विशेषकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावातील घरात दिसतील. या दिवसात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आंबा, काजूगर किंवा कोकम सरबत देऊन केले जाते. पण आंबा, काजू या दोन फळांप्रमाणे कोकमासाठी म्हणाव्या तशा प्रमाणात बाजारपेठ अथवा प्रसिध्दी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या फळापासून तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठेत योग्य दर मिळत नाही, ही येथील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे.आंबा, काजूनंतर कोकमचा हंगाम सुरू होतो. सध्या रेडी, शिरोडा, आरोंदा, आजगाव, तिरोडा, आरवली, टाक, आसोली, सोन्सुरे, धाकोरे, मळेवाड या गावांमध्ये या हंगामातील रातांबे गोळा करून त्यापासून विविध उत्पादने घेण्यासाठी शेतकरीवर्ग झटत असतो. रातांब्यापासून आमसुले (आगळी सोले), बियांपासून मुटला, कोकम सरबत, जेवणानंतर पचवण्यासाठी सोलकढी अशा प्रकारची घरगुती उत्पादने घेतली जातात. मात्र, इतर फळांच्या तुलनेत हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रंदिवस कष्ट करावे लागतात.कोकम तयार करण्याची पध्दतकोकम तयार करताना सर्वप्रथम झाडावर तयार झालेला रातांबा वर चढून काढावा लागतो. त्यानंतर गोळा करून तो घरी आणला जातो. घरातील माणसे किंवा मजूरवर्ग लावून त्या फळांचा रस, बिया व पाकळ्या वेगवेगळ्या केल्या जातात. आमसुले बनविताना तर अपार कष्ट करावे लागतात. कारण रातांब्याच्या पाकळ्या वेगळ्या केल्यानंतर त्या पाकळ्या चारवेळा आगळ या रसामध्ये भिजवून कडक उन्हात सुकवाव्या लागतात. यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी जातो. प्रत्यक्षात आमसुले तयार करीत असताना नाकीनऊ येतात. मात्र, तयार झालेल्या आमसुलांना मिळणारा दर फार अल्प असतो. ही सर्व मेहनत ती तयार करण्यापेक्षा आमसुले बाजारात विकत घेणे परवडते. आमसुले तयार करताना त्यासाठीची मेहनत, मनुष्यबळ व होणारा खर्च पाहता मिळणारे उत्पन्न खूपच कमी असते. त्यामुळे कोकम तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.उत्पादने आमसुले (आगळी सोला) - सर्वसामान्यघर ते पंचतारांकित हॉटेलमध्ये मच्छीकढी, आमटी, कालवण व सोलकढीला उत्कृष्ट चव येण्यासाठी कढी उकळताना प्रमाणानुसार आत आमसुले टाकली जातात. पित्त आले तर आमसुले पाण्यात भिजवून लावतात व कोकम रस पिण्यासाठी दिला जातो. कोकम रस उत्कृष्ट चवदार, थंड सरबत, ज्यूस, जेवल्यानंतर पचनासाठी उत्कृष्ट सोलकढीसाठीचा वापर केला जातो.मुटले - कोकमाच्या बियांपासून उत्कृष्ट मुटले तयार केले जाते. त्याचा आहारात चपातीवर कडवून तेल म्हणून वापर केला जातो. थंडीच्या दिवसात माणसांच्या पायांना, ओठांना भेगा पडल्यास मुटले कडवून घासून लावले जाते. त्यामुळे भेगांमधील दाह शांत होऊन भेगा बऱ्या होतात. अशाप्रकारे कोकणातील परंपरागत कोकम व्यवसाय करणारा शेतकरी थोड्याफार प्रमाणात का होईना, स्वत:चा उदरनिर्वाह करतात. सध्या बाजारपेठेत आमसुले १५० रूपये प्रतिकिलो दराने, कोकम मुटले २० रूपये प्रतिनग आणि सुकवलेल्या बिया (जुन्या) ५० रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जातात.शासनस्तरावर पडीक जमिनीत रातांबा लागवडीसाठी शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमांतून प्रोत्साहनपर भाषणे दिली जातात. विविध योजना राबवून लोकांना कोकम लागवडीसाठी प्रवृत्त केले जाते. प्रत्यक्षात मात्र जे लोक हा व्यवसाय परंपरागत करत आहेत, त्यांच्या मालाला उत्तम प्रकारची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. याबाबत शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत असून, चांगल्या दराची प्रतीक्षा आहे.कोकमची प्रसिध्दी व्हावी, रातांब्यापासून विविध उत्पादने बनविण्याच्या कोकणातील या परंपरागत व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करून त्यासाठी शासनाने एक समिती बनविणे आवश्यक आहे. या समितीद्वारे उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यास प्रयत्न केले पाहिजेत. तरच हा व्यवसाय करणारा शेतकरी, बागायतदार व मजूरवर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल. - अब्बास शेख,बागायतदार, रेडी-म्हारतळेवाडीआमसुले तयार करण्यापूर्वी रातांबा झाडावरून खाली काढण्यासाठी व रातांबा फोडण्यासाठी जास्त मोबदला देऊनही मजूरवर्ग वेळेत मिळत नाही. ही येथील शेतक री, बागायतदारांची मोठी समस्या आहे. त्यामुळे पाऊस पडल्यावर काढलेला रातांबा खराब होतो.