रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील रिळ गावचे शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांना शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून पहिला क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराची घोषणा गुरुवारी उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी कृषी समितीच्या सभेत केली.शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची सभा झाली. या सभेमध्ये सन २०१४-१५ साठी जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून सहा शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागाकडे आले होते. यात प्रथम क्रमांक मिलिंद वैद्य (रिळ, रत्नागिरी) यांना, द्वितीय क्रमांक डॉ. अनिल विठ्ठल जोशी (नरवण, गुहागर) यांना आणि तृतीय क्रमांक रामदास सखाराम घाग (खरवते, चिपळूण) यांना जाहीर करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पी. एन. देशमुख, कृषी समितीचे सर्व सदस्य, सर्व अधिकारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांना पुरस्कार
By admin | Updated: April 10, 2015 00:32 IST